Home संगमनेर राज्यात ग्रामपंचायतीमध्ये कॉंग्रेसचे सर्वाधिक सरपंच: महसूलमंत्री बाळासाहेब थोरात

राज्यात ग्रामपंचायतीमध्ये कॉंग्रेसचे सर्वाधिक सरपंच: महसूलमंत्री बाळासाहेब थोरात

Balasaheb Thorat Congress sarpanches in the Gram Panchayat in the state

Balasaheb Thorat: राज्यातील ग्रामपंचायतीत कॉग्रेसचे सर्वाधिक सरपंच असतील असा विश्वास महसूलमंत्री बाळासाहेब थोरात

संगमनेर: विधान परिषदेच्या निवडणुकीत चांगले यश मिळाल्यामुळे कॉंग्रेस कार्यकर्त्यांचे मनोबल वाढले असल्याने राज्यातील ग्रामपंचायतीत कॉग्रेसचे सर्वाधिक सरपंच असतील असा विश्वास महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केला आहे.

शनिवारी महसूलमंत्री थोरात हे संगमनेर विधानसभा मतदार संघात आले होते. त्यावेळी त्यानी पत्रकारांशी संवाद साधत विश्वास व्यक्त केला.

महाविकास आघाडीत समन्वय नाही असे बोलणार्यांना दुसरे काम तरी काय असा खोचक टोला चंद्रकांत पाटलांना थोरात यांनी लगाविला. 

ग्रामपंचायत निवडणूक ही गावपातळीवर असते. प्रत्येकाला आपला पक्ष वाढविण्याची जबाबदारी असते आमचाही प्रयत्न तसाच असल्याचे महसूलमंत्री थोरात म्हणाले. कॉंग्रेस कार्यकर्त्यांचे मनोबल हे चागलेच वाढले असल्याने येत्या ग्रामपंचायत निवडणुकीत कॉंग्रेस पक्षाचे अधिक सरपंच दिसतील असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.   

Web Title: Balasaheb Thorat Congress sarpanches in the Gram Panchayat in the state

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here