Home अकोले Akole: अकोले तालुक्यात आज ९ करोनाबाधितांची वाढ  

Akole: अकोले तालुक्यात आज ९ करोनाबाधितांची वाढ  

Akole Taluka today 9 coronavirus infected

अकोले | Akole: तालुक्यात आज एकूण ९ व्यक्ती पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. मागील आठवड्याच्या तुलनेत आज बाधितांची संख्या काही प्रमाणात वाढली आहे.

अकोले तालुक्यात आज एकूण ४३ चाचणी घेण्यात आल्या यामध्ये २ जण बाधित आढळून आले आहेत. तर शासकीय अहवालात ७ जण बाधित आढळून आले आहेत. त्यामुळे तालुक्याची संख्या ३०८७ इतकी झाली आहे.

आज प्राप्त झालेल्या अहवालात अकोले येथे १९ वर्षीय महिला, ५० वर्षीय पुरुष, पिंपळगाव निपाणी येथे ६४ वर्षीय पुरुष, गणोरे येथे २८ वर्षीय पुरुष, लाहित बुद्रुक येथे २९ वर्षीय महिला आणि ३ वर्षीय मुलगी, वाघदरी येथे ५७ वर्षीय पुरुष व ५० वर्षीय महिला असे ९ जण बाधित आढळून आल्याने एकूण रुग्णसंख्या ३०८७ वर पोहोचली आहे.  

Web Title: Akole Taluka today 9 coronavirus infected

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here