Home महाराष्ट्र Murder: पत्नीच्या अनैतिक संशयावरून पतीने पत्नीस चाकूने भोसकले

Murder: पत्नीच्या अनैतिक संशयावरून पतीने पत्नीस चाकूने भोसकले

husband Murder his wife out of suspicion of immorality

बेळगाव | Belgaav: पत्नीच्या अनैतिक संबंध असल्याच्या संशयावरून पतीने पत्नीच्या पोटात चाकू भोसकून खून केल्याची घटना घडली आहे. ही घटना बेळगाव येथील ऑटोनगर येथे शुक्रवारी दि. १८ रोजी घडली. याप्रकरणी पोलिसांनी पतीला अटक केली आहे.

सखुबाई पुंडलिक लामानी असे या खून झालेल्या महिलेचे नाव आहे. पुंडलिक लमाणी याला माळमारुती पोलिसांनी अटक केली आहे.

याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, रामपूर लमाणी तांडा येथील मुळचे दाम्पत्य गेल्या काही दिवसांपासून कामानिमित्त ऑटोनगर येथे भाड्याच्या घरात राहत असे. पत्नी सखुबाई हिचे बाहेर अनैतिक संबंध असल्याचा संशय पुंडलिक यांचा होता. त्यामुळे त्यांच्या कधीमधी घरात भांडणे होत असत. काल रात्री पुंडलीकाने पत्नीबरोबर भांडण काढून तिच्या  पोटात चाकू भोसकल्याने ती जागीच ठार झाली. या घटनेची माहिती समजताच माळमारुती पोलीस ठाण्याचे निरीक्षक सुनील पाटील व सहकारी यांनी घटनास्थळी धाव घेतली. पंचनामा केला आणि पतीस पोलिसांनी अटक केली आहे. अधिक तपास पोलीस करीत आहेत.  

Web Title: husband Murder his wife out of suspicion of immorality

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here