Sangamner: संगमनेर तालुक्यात आज ३३ करोना पॉझिटिव्ह
संगमनेर: संगमनेर तालुक्यात आज ३३ करोनाबाधित आढळून आले आहेत. शहरात १० जण तर ग्रामीण भागातून २३ जण बाधित आढळून आले आहेत.
आज प्राप्त झालेल्या अहवालात शहरात कोष्टी गल्ली येथे ५९ वर्षीय महिला, जनतानगर येथे ३२ व ३० वर्षीय पुरुष, मालदाड रोड येथे ५० वर्षीय महिला, १२ वर्षीय मुलगा, साई श्रद्धा चौक येथे ९ वर्षीय मुलगी, चैतन्यनगर येथे ४२ वर्षीय पुरुष, माळीवाडा येथे ६९ वर्षीय पुरुष, देवी गल्ली येथे ६० वर्षीय महिला, सावता माळी नगर येथे ६५ वर्षीय पुरुष असे बाधित आढळून आले आहेत.
तर ग्रामीण भागातून शेडगाव येथे ५० वर्षीय महिला, १८ वर्षीय तरुण, पिंपरी येथे ५५ वर्षीय महिला, चंदनापुरी येथे ३६,४०,११ वर्षीय पुरुष, ६५ वर्षीय महिला, पिंपळगाव देपा येथे ५८ वर्षीय ५८ वर्षीय महिला, ३३,३५ वर्षीय पुरुष, कोकणगाव येथे २९ वर्षीय महिला, निमगाव जाळी येथे २४ वर्षीय पुरुष, गुंजाळवाडी येथे १३ वर्षीय मुलगी, ११ वर्षीय मुलगा, ५७ वर्षीय पुरुष, मालदाड येथे ८० वर्षीय पुरुष, निमगाव टेंभी येथे ४४ वर्षीय महिला, निमगाव जाळी येथे ७९ वर्षीय पुरुष, राजापूर येथे ३० वर्षीय पुरुष, वडगाव पान येथे ४० वर्षीय पुरुष, तळेगाव दिघे येथे ५१ वर्षीय पुरुष, घुलेवाडी येथे ५२ वर्षीय महिला असे ३३ बाधित आढळून आले आहेत.
Web Title: Sangamner Taluka 33 Corona infected Today