Home पाथर्डी महामार्गावर दुचाकी वीजवाहक तारांना चिकटली, विजेच्या धक्क्याने दोघे गंभीर

महामार्गावर दुचाकी वीजवाहक तारांना चिकटली, विजेच्या धक्क्याने दोघे गंभीर

Pathardi two-wheeler stuck to the power lines on the highway

पाथर्डी |Pathardi: शहरानजीक असलेल्या तनपुरवाडी गावाच्या जवळ राष्ट्रीय महामार्गावरील पुलावर वीज वाहक तारा तुटून पडल्याने वाटसरुची मोटारसायकल तारांवरून गेल्याने विजेचा धक्का लागून दोघे जन गंभीर जखमी झाले आहेत. ही घटना सकाळी ९ वाजण्याच्या सुमारास घडली.

किरण रघुनाथ पंडित व निवृत्ती महादेव पंडित अकोला येथील रहिवासी हे दोघेजण सकाळी ९ वाजेच्या सुमारास पाथर्डी येथे दुचाकीवरून येत असताना तनपुरवाडी पुलावर उच्च दाबाच्या वीज वाहक तारा तुटून पडलेल्या होत्या. या तारांचा त्यांना अंदाज न आल्याने त्यांची गाडी थेट वीज वाहक तारांना जाऊन चिकटली. यामध्ये दोघांनाही विजेचा धक्का बसल्याने गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना उपचारासाठी शहरातील नवजीवन हॉस्पिटलमध्ये हलविण्यात आले आहे. वीज वितरण कंपनीच्या गलथान कारभारामुळे वीज वाहक तारा महामार्गावर पडल्याने जीवितहानी होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. तारांना संरक्षक जाळी नसल्याने हा अपघात घडला.  

Web Title: Pathardi two-wheeler stuck to the power lines on the highway

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here