Home महाराष्ट्र भारताने ऑस्ट्रेलियाला लोळविले, भारताने मोडला पाकीस्तानचा विक्रम

भारताने ऑस्ट्रेलियाला लोळविले, भारताने मोडला पाकीस्तानचा विक्रम

India vs Australia 2nd T20 I India Won by 6 Wickets Today

India vs Australia 2nd T20 I:   शिखर धवनचे अर्धशतक, लोकेश राहुल विराट कोहली व हार्दिक पांड्याच्या फटकेबाजीने ऑस्ट्रेलियाचे १९५ धावांचे आव्हान ६ विकेटस राखून विजय मिळविला.

भारताने या मालिकेत २-० अशी आघाडी घेतली आहे. यासह पाकिस्तानचा विक्रम मोडला आहे. शिखर धवनने ३४ चेंडूत अर्धशतक केले. लोकेश राहुल व शिखर धवन या ससलामी जोडीने चांगली सुरुवात दिली. यांनी अर्धशतकी भागीदारी केली. मात्र सहाव्या षटकात भारताला धक्का दिला. राहुल ३० धावांवर झेलबाद झाला. पण शिखर धवन याने चांगलीच फटकेबाजी करत ५२ धावा करून तंबूत परतला. संजू आज पुन्हा एकदा अपयशी ठारला त्याने १५ धावा केल्या. विराटने २४ चेंडूत ४० धावा करीत माघारी परतला. हार्दिक व श्रेयस ने फटकेबाजी करत मालिका जिंकली. हार्दिकने २२ चेंडूत ४२ धावा केल्या तर श्रेयस ने ५ चेंडूत १२ धावा केल्या. भारताने ६ विकेटस राखून विजय मिळविला.

पाकीस्तान विक्रम मोडला: भारत सलग १० सामने २०-२० मध्ये अपराजित राहिली आहे. पाकिस्तान सलग ९ सलग सामने अपराजित राहिला होता. पाकिस्तानने जुलै २०१८ ते नोव्हेंबर २०१८ या कालावधीत सलग ९ सामने जिंकले होते. सलग सर्वाधिक २०-२० सामने जिंकण्याचा पराक्रम अफगाणिस्तानच्या नावे आहेत त्याने सलग १२ सामने जिंकले आहेत.  

Web Title: India vs Australia 2nd T20 I India Won by 6 Wickets 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here