संगमनेर तालुक्यात ४० करोनाबाधितांची वाढ तर अकोले तालुक्यात दोन
संगमनेर | Sangamner: संगमनेर तालुक्यात शनिवारी ४० जण करोनाबाधित आढळून आले आहेत. शहरात ९ तर ग्रामीण भागात ३१ जन बाधित आढळून आले आहेत.
शनिवारी प्राप्त झालेल्या अहवालात ग्रामीण भागात आश्वी खुर्द येथे ४१,३० वर्षीय पुरुष, ४८ वर्षीय महिला, अंभोरे येथे १५ वर्षीय मुलगा, ६२ वर्षीय पुरुष, ६० वर्षीय महिला, उंबरी बाळापुर येथे ४० वर्षीय पुरुष, ३८ वर्षीय महिला, निमज येथे ४३ वर्षीय महिला, ५६ वर्षीय पुरुष, नांदूर खंदरमाळ येथे ५६ वर्षीय पुरुष, कौठे खुर्द येथे ५० वर्षीय पुरुष, निमगाव भोजापूर २१ वर्षीय महिला, २८ वर्षीय पुरुष, पिंपळगाव कोन्झीरा येथे ३० वर्षीय पुरुष, जवळे कडलग ४५ वर्षीय पुरुष, २७ वर्षीय तरुणी, प्रतापपूर ४३,२१ वर्षीय महिला, ५३ वर्षीय पुरुष, निमगावजाळी येथे २६ वर्षीय पुरुष, रहिमपूर येथे ५५ वर्षीय महिला, ५८ वर्षीय पुरुष, कासारे येथे १० वर्षीय मुलगा, तळेगाव दिघे २६ वर्षीय महिला, राहणेमळा गुंजाळवाडी येथे ८०,३६ वर्षीय पुरुष, सोनुशी येथे ५० वर्षीय पुरुष, निळवंडे येथे ७३ वर्षीय पुरुष, घुलेवाडी येथे ६० वर्षीय पुरुष, असे ३१ जण बाधित आढळून आले आहेत.
शहरात अरगडे मळा संगमनेर येथे ४७ वर्षीय पुरुष, अमृतनगर येथे २२ वर्षीय महिला, इंदिरानगर येथे ४०,१५ वर्षीय महिला, ३५ वर्षीय पुरुष, भारतनगर येथे ३२,५६ वर्षीय महिला, गोविंदनगर येथे ६७ वर्षीय पुरुष, संगमनेर कॉलेज समोर ५० वर्षीय महिला असे ९ बाधित आढळून आले आहेत.
अकोले तालुक्यात आज रविवारी कोतूळ येथील ३८ वर्षीय महिला, तर नवलेवाडी रोड ७० वर्षीय महिला असे दोन बाधित आढळून आले आहेत. एकूण रुग्णसंख्या ३०१४ इतकी झाली आहे.
Web Title: Sangamner Taluka 40 corona infected yesterday