Home पाथर्डी गेल्या आठ दिवसांत धुमाकूळ घालणारा बिबट्या अखेर जेरबंद

गेल्या आठ दिवसांत धुमाकूळ घालणारा बिबट्या अखेर जेरबंद

Pathrdi Dhumaku Ghalanara Bibtya Akher Gerband

पाथर्डी | Pathardi: पाथर्डी तालुक्यात गेल्या आठ दिवसांपासून धुमाकूळ घालीत असलेला बिबट्या अखेर जेरबंद करण्यात अखेर वनविभागाला यश आले आहे. गुरुवारी पहाटे सावरगाव हद्दीत सटवाई दर्याचे वरील पठारावर लावण्यात आलेल्या पिंजऱ्यात बिबट्या जेरबंद झाला आहे.

अहमदनगर, जळगाव, पुणे, औरंगाबाद, बीडची पथके या बिबट्या मोहिमेत पाच दिवसांपासून कार्यरत होती. गुरुवारी पहाटे तीन वाजेनंतर पिंजरयातील बोकडाचा फडशा पाडला. बोकडाचा फडश्या पार पडत असताना पिंजर्याचा दरवाजा बंद होऊन बिबट्या जेरबंद झाला. अनेक दिवसांपासून हा बिबट्या शिरापूर, पानतासवाडी, करडवाडी, सट्वाईदरा, गाढवदरा या भागांत वावरत होता. त्याने याच भागांत अनेक रानडुकरे यांचाही फडशा पाडला आहे. भक्षाची शोद्ग घेत त्याने मानवी वस्त्यांकडे वळाला होता. या बिबट्याने आठ दिवसांत तीन मुलांना उचलून नेले होते. त्यात त्यांचा मृत्यू झाला होता.   

महाराष्ट्र व अहमदनगर जिल्ह्यातील ताज्या व महत्वाच्या बातम्या मिळवा, आजच जॉईन करण्यासाठी येथे क्लिक (@Sangamner Akole News) करा.

See: Ahmednagar News, and  Latest Marathi News Live

Web Title: Pathrdi Dhumaku Ghalanara Bibtya Akher Gerband

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here