Home अकोले अकोले तालुक्यात महिला नवदुर्गा पुरस्कार कार्यक्रम संपन्न

अकोले तालुक्यात महिला नवदुर्गा पुरस्कार कार्यक्रम संपन्न

Akole Talukyat Mahilaancha Navadurga Award Program

अकोले प्रतिनिधी: आज महिला घरातील सर्व जबाबदारी पार पाडून नोकरी, व्यवसाय सह सर्व क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करत आहे. महीलाच्या हाती दिलेली जबाबदारी त्या उत्तम प्रकारे पार पाडतात. कोरोना संकटकाळात तालुक्यातील विविध क्षेत्रातील महिलांनी केलेले कार्य प्रेरणादायी असल्याचे मत माजी आमदार व भाजपाचे प्रदेश का.सदस्य वैभवराव पिचड यांनी व्यक्त केले.

भारतीय जनता पार्टी महीला मोर्चा आयोजित नवदुर्गा पुरस्कार कार्यक्रम राघव सभागृह, रासणे कॅाम्पलेक्स येथे साै.पुष्पाताई वाणी यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला. यावेळी मा.आ.पिचड बोलत होते .यावेळी पद्मश्री राहीबाई पोपेरे, भाजपा तालुकाध्यक्ष सीताराम भांगरे, अकोले एज्युकेशनचे सेक्रेटरी यशवंतराव आभाळे, जेष्ठ नेते भाजपा जिल्हा उपाध्यक्ष गिरजाजी जाधव ,नगराध्यक्ष साै.संगिता शेटे, उपनगराध्यक्ष बाळासाहेब वडजे व्यासपीठावर उपस्थित होते.

यावेळी पुढे बोलताना पिचड म्हणाले कि तालुक्यातील महीला विविध क्षेत्रात उल्लेखनीय काम करत आहे.स्वतःला सिद्ध करण्याचे काम महिलांनी केले आहे. त्यांचा सन्मान होणे गरजेचे होते हीच गोष्ट हेरून आमच्या भाजपा महीला मोर्चाचे जिल्हाध्यक्षा सोनाली नाईकवाडी यांनी नुकत्याच झालेल्या नवराञ महोत्सव प्रसंगी ही संकल्पना सांगितली व आज त्यानुसार हा नवदुर्गा पुरस्कार देऊन तालुक्यातील उल्लेखनीय कार्य करणाऱ्या, समाजाच्या हितासाठी काम करणाऱ्या महिलांचा सन्मान होतोय. जगाबरोबर आपल्या तालुक्यातील महीलांही कुठे कमी नाहीत. कोरोना संकटकाळात तालुक्यातील गावा-गावातील सरपंच, ग्रामसेवक,सदस्य महीला, तसेच अंगणवाडी सेविका, आरोग्य सेविका यांनी कोरोना कमिटीत स्थान घेऊन गावातील प्रत्येक घरा घरात, वाडी वस्तीवर शासनाच्या तुटपुंज्या साहित्यावर प्रसंगी केवळ स्वतः घेतलेला  मास्क  वापरून सर्व्हे केला. घरा-घरात जाऊन कोणी आजारी आहे का?  कुणाला लक्षणे आहे का हे पाहीले, ताप तपासला यावेळी अनेक ठिकाणी त्यांना लोकांच्या रोषालाही सामोरे जावे लागले. माञ त्यांनी गावातील सर्व नागरिकांची काळजी घेतली. त्याच बरोबर नगरपंचायत,  ग्रामपंचायत अंतर्गत सफाई कर्मचारी महिलांनी काम केले. वैद्यकीय क्षेत्रातही महीला डॅाक्टर्स व परिचारिका यांनी प्रसंगी  आपल्या जीवाची काळजी न करता नागरिकांना वैद्यकीय सेवा देण्याचे काम केले. तालुका पोलिस स्टेशन मध्ये कार्यरत असलेल्या महीला पोलिस यांनी तर लॅाकडाऊनच्या सुरूवातीच्या काळात सगळे भयभीत असताना, कडक लॅाकडाऊन, सर्व रस्ते,गाव निर्मनुष्य असताना चाैकात उन्हात दिवस-रात्र उभे राहून ड्युटी करत आपल्या लोकांची सेवा केली. अशा या सर्व क्षेत्रातील कोरोना योद्धा  महीला या ख-या नवदुर्गा आहेत त्यांचा आज सन्मान हा उचित सन्मान आहे.

यावेळी पद्मश्री राहीबाई पोपेरे म्हणाल्या कि मी शाळा शिकले नाही, माञ निसर्गाची शाळा व काळ्या मातीशी केलेल्या प्रेमामुळे मला समाजात सन्मान मिळाला. समाजासाठी केलेल्या कामाचे निश्चित समाधान मिळते. पुढची पिढी सक्षम कशी होईल यासाठी  महिलांनी  काम केले पाहिजे.प्रत्येक महिलेने आपल्या घरापुढे शोच्या झाडाएवजी गावराण बियांनाची झाड लावावे. सर्व आजार दुर करण्यासाठी मुलांना व घरात देशी, गावराण खाद्य पदार्थ आहारात दिले पाहिजे. देशी गावराण गाईचे दुध व गावराण खाद्य,राणभाज्या खा.असे मार्गदर्शन करत प्रत्येक शेतकऱ्याचे दारात एक तरी देशी गाई असली पाहिजे अशी अपेक्षा व्यक्त केली.

कार्यक्रमाचे स्वागत- प्रास्तविक करताना भाजपा महीला मोर्चा जिल्हाध्यक्ष साै. सोनालीताई नाईकवाडी म्हणाल्या आज महीला सगळीकडे उत्तम काम करत आहे.समाजाला  दिशा देणारे काम महीला करत आहे.हे सगळे होत असताना महीलेने महीलेसाठी उभे राहीले पाहिजे. आज महिलांच्या सन्मानासाठी एवढ्या मोठ्या संख्येने महीला उपस्थित राहिल्या यावरूनच तालुक्यातील महीला आता कशातही मागे राहणार नाही हे दाखवून दिल्याचे सांगितले .आभार साै.शारदा गायकर यांनी मानले.

यावेळी  भाजपा महीला आघाडीचे वतिने समाजातील वैद्यकीय सेवा,समाजिक,राजकीय, विधी,बचतगट,अंगणवाडी सेविका,आरोग्य सेविका व क्रीडा आदि क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेल्या  महिलांचा सन्मान नवदुर्गा पुरस्कार देऊन करण्यात आला. यावेळी प्रथम देशात अकोलेचे नाव पोहचविणा-या पद्मश्री राहीबाई पोपेरे, स्वयंसेवक संघाचे माध्यमातून सामाजिक काम केलेले साै.सुधाताईं चंद्रशेखर देशपांडे,वैद्यकीय क्षेत्रातील डॅा.उमाताई उल्हास कुलकर्णी, डॅा.सुरेखा विजय पोपेरे, डॅा.ज्योती मारूती भांडकोळी, डॅा.पुनम संतोष कानवडे,विधीतज्ञ ॲड.पुष्पाताई शरद चाैधरी, ॲड.मंगल किसन हांडे, कृषी कुमुदिनी पोखरकर ,उत्कृष्ट तलाठी साैा.सोनाली देशमुख (वलवे)अल्पसंख्याक समाजातून येेेवुन नगरपंचायत उत्कृष्ट काम साै.शबानाभाभी राजु शेख,पोलिस.पा.साै.प्रणाली धुमाळ,साै.सुनिता गायकर,अंंगणवाडी सेविका साै.आशा ढगे,वारकरी ह.भ.प.शितलताई गुंजाळ ,काव्या दिपक कदम, रिटायर्ड शिक्षीका साै.विमल भॊईर,साै.प्रतिमा सुर्यवंशी, पोलिस हवालदार  संगिता आहेर (मालुंजकर), पार्वती संतोष साबळे,आरती कचरु पानसरे,विमल वायकर, आशा सेविका – भारती गायकवाड, फरीदा पठाण,सुनिता गजे,अनिता वाकचाैरे, नैना शिवाजी पांडे, स्वाती प्रवीण ताजणे, सुनिता मोहन पथवे, उषा किशोर अडांगळे, वर्षाताई मिनानाथ पांडे, अरूणा तुकाराम चव्हाण, अनिता सोमनाथ शिंदे, शालिनीताई वाकचाैरे, कविता प्रकाश बोडके, मंदाताई पांडे, सुजाता गायके, अलका गि-हे,साै.मनिषा संजय भांगरे,संगिता चंद्रकात साळवे. नगरपंचायत कर्मचारी शांताबाई साळवे,सिंधुबाई आढाव, लीलाबाई भांगरे, समिता गायकवाड, उषाताई लवांडे, काविरी अवचिते, मुक्ताताई घाटकर, प्रति जेधे,रूपाली बनकर, चारुशीला गोंदके, नगरपंचायत अभियंता निवेदिता कुलकर्णी, खेळाडू कु नेहा गोरे,साक्षी कोळपकर,प्रियंका बांगुर्डे,प्रतिभा फापाळे, पुष्पा कुरकुटे,मीनाताई चाैधरी, सुनिता बो-हाडे, आरोग्य सेविका छायाताई शिंदे यांना नवदुर्गा पुरस्कार देवून सन्मान करण्यात आला .

महाराष्ट्र व अहमदनगर जिल्ह्यातील ताज्या व महत्वाच्या बातम्या मिळवा, आजच जॉईन करण्यासाठी येथे क्लिक (@Sangamner Akole News) करा.

See: Ahmednagar News, and  Latest Marathi News Live

Web Title: Akole Talukyat Mahilaancha Navadurga Award Program

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here