मासिक पाळी दरम्यान स्मृती इराणी संसदेत जात नाही का? – तृप्ती देसाई
मासिक पाळी दरम्यान स्मृती इराणी संसदेत जात नाही का? – तृप्ती देसाई
मुंबई: मासिक पाळी दरम्यान रक्तान माखलेल्या पॅड घेऊन तुम्ही मित्राच्या घरी जाल का? असा प्रश्न विचारणाऱ्या स्मृती इरानीवर चांगलीच टीकेची झोड उठली आहे. शबरीमला मंदिरात महिलांना प्रवेश मिळण्यावरून विचारण्यात आलेल्या प्रश्नावर उत्तर देताना इराणीने हे वादग्रस्त वक्तव्य केले. त्यानंतर त्यांनी सारवासारव हि केली. मात्र आता याच प्रश्नावरून सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई यांनी स्मृती इराणीवर निशाना साधला आहे. ज्या संसदेला मंदिर म्हंटले जाते. त्या संसदेमध्ये स्मृती इराणी पाळी आल्यानंतर जात नाही का? असा सवाल तृप्ती देसाई यांनी उपस्थित केला आहे.
You May Also Like: Bollywood Actresses Priyanka Chopra, Mallika successful adult Movie
स्मृती इराणी यांच्या वक्तव्यावरून बीबीसी मराठी शी बोलताना तृप्ती देसाई यांनी इराणी यांच्या वक्तव्याचा समाचार घेतला. या प्रकरणासंदर्भात बोलताना ‘आपण देशाच्या संसदेला सुद्धा मंदिरच म्हणतो आणि त्या मंदिरामध्ये स्मृती इराणी कॅबिनेट मिनिस्टर म्हणून काम करतात. तेव्हा मासिक पाळी आल्यावर त्या काम करत नाही का? असा सवाल देसाई यांनी उपस्थित केला. तसेच मासिक पाळी सुरु असताना मंदिरात काय मित्राकडे हि जाऊ नका अस ऐकवलं जात तरी मासिक पाळीत महिला कोणकोणत काम करतात या संदर्भात विचारले असता तृप्ती देसाई यांनी आपण मासिक पाळी सुरु असतानी कधी दौरे रद्द केले नाही असे सांगितले. मी जेव्हा समाजामध्ये एक महिला कार्यकर्ता म्हणून कार्य करते तेव्हा अनेक कार्यक्रम नियोजित दौरे असतात. नियोजित दौरा असतानाचा अचानक मासिक पाळी आली तर तो दौरा आम्ही रद्द करत नाही. उलट अशा परिस्थितीतही आम्ही उत्साहाने काम करतो. तसेच नवरात्र, गणेश उत्सव आम्हाला अनेक ठिकाणी बोलावलं जात मात्र तेव्हा मासिक पाळी येईल म्हणून आम्ही एखादी तारीख देत नाही अस कधीच होत नसल्याचही देसाई यांनी सांगितले.
Website Title: period of menstruation smurti irani and trupti desai
आमच्या मराठी बातम्या लाइव व्हाॅॅटस अॅप ग्रुपला जॉईन होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा. मराठी बातम्या लाइव–येथे क्लिक करा. किवा आमचा नंबर 9850540436 सेव्ह करा आणि Add Me नावासह मेसेज करा. रहा अपडेट दररोज. बातमी आवडल्यास जरूर शेअर करा. धन्यवाद.
आपण आपल्या बिझनेस, व्यवसाय, न्यूज , संस्था यांची वेबसाइट बनवू शकता. फक्त 2499/- रु. मध्ये 1 वर्षाकरिता आजच संपर्क करा. 9850540436
मराठी बातम्या लाइव: आपल्या परिसरातील घटना, बातमी, समस्या आपल्या भाषेत सांगावी असे आपल्यालाही वाटत असेल, ती संधी आम्ही तुम्हाला देतो. सोबत तुम्ही त्यासंबंधीचा फोटोही आम्हाला पाठवा. आपली बातमी मोफत प्रसिद्ध केली जाईल. त्यासाठी येथे क्लिक करा
प्रमोटेड बातम्या: