Home संगमनेर संगमनेर: प्रवरा नदी पात्रात बुडून तीन मुलांचा मृत्यू

संगमनेर: प्रवरा नदी पात्रात बुडून तीन मुलांचा मृत्यू

संगमनेर: प्रवरा नदी पात्रात बुडून तीन मुलांचा मृत्यू

संगमनेर: प्रवरा नदीपात्रात अंघोळ करण्यासाठी गेलेल्या तीन मुलांचा खोल पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना संगमनेर तालुक्यातील मंगळापूर शिवारात आज शनिवारी सकाळी ११ वाजेच्या सुमारास घडली. या घटनेमुळे ऐन सणासुदीच्या दिवसांत मंगळापूर गावात शोककळा पसरली आहे.

समर्थ दीपक वाळे (वय १०), रोहित चंद्रकांत वैराळ (वय ११), वेदांत विनोद वैराळ (वय ९) तिघेही रा. मंगळापूर ता. संगमनेर असे या मृत मुलांची नावे आहेत. हे तिघेही शनिवारी सकाळी अंघोळीसाठी नदीपात्राकडे गेले होते. सध्या प्रवरेला शेतीसाठी आवर्तन सुरु असल्याने अंघोळ करत असताना खड्ड्यांचा अंदाज न आल्याने हे तिघेही खड्ड्यात ओढले गेले. एकमेकांना वाचविताना तिघेही खड्ड्यात ओढले गेले. नदीवर कपडे धुण्यासाठी आलेल्या महिलांच्या हि बाब लक्षात आल्याने त्यांनी आरडाओरडा केला. मात्र त्यापूर्वीच तिघेही बुडाले होते. आरडाओरडा झाल्यानंतर जवळपास असलेल्या युवकांनी नदीपात्राकडे धाव घेतली.

You May Also Like: Bollywood Actresses Priyanka Chopra, Mallika successful adult Movie

गावातील अजय रुपवते, सुभाष दिघे व त्याच्या सहकार्यानी शोध घेण्याचा व बाहेर काढण्याचा आटोकाट प्रयत्न केला. मात्र त्यात त्यांना यश आले नाही. घटनेची माहिती समजताच घटनास्थळी ग्रामस्थांनी मोठी गर्दी केली होती. यात मुलांच्या पालकांचाही समावेश होता. पोहणाऱ्या तरुणांनी नदीपात्रात या तिघांचा शोध घेतला असता नदीत एका खड्ड्यात या तिघांचेहि मृतदेह आढळून आले. त्यांना तातडीने संगमनेर येथील खासगी रुग्णालयात आणण्यात आले. मात्र उपचारापूर्वीच ते मयत झाल्याचे वैद्यकीय अधिकार्यांनी सांगितले. नदीपात्रात मोठ्या प्रमाणावर वाळूचे खड्ड्यांमुळे हि घटना घडली असून तालुक्यात हळहळ व्यक्त होत आहे.   

Website Title: sangamner taluka news Three children die drowning in Pravara river


आमच्या मराठी बातम्या लाइव व्हाॅॅटस अॅप ग्रुपला जॉईन होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा. मराठी बातम्या लाइव–येथे क्लिक करा.  किवा आमचा नंबर 9850540436 सेव्ह करा आणि Add Me नावासह मेसेज करा. रहा अपडेट दररोज. बातमी आवडल्यास जरूर शेअर करा. धन्यवाद.


आपण आपल्या बिझनेस, व्यवसाय, न्यूज , संस्था यांची वेबसाइट बनवू शकता. फक्त 2499/- रु. मध्ये 1 वर्षाकरिता आजच संपर्क करा. 9850540436


मराठी बातम्या लाइव: आपल्या परिसरातील घटना, बातमी, समस्या आपल्या भाषेत सांगावी असे आपल्यालाही वाटत असेल, ती संधी आम्ही तुम्हाला देतो. सोबत तुम्ही त्यासंबंधीचा फोटोही आम्हाला पाठवा. आपली बातमी मोफत प्रसिद्ध केली जाईल. त्यासाठी येथे क्लिक करा



प्रमोटेड बातम्या:

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here