Home अहमदनगर अहमदनगर: तू माझ्यासोबत प्रेमसंबंध ठेव नाही तर तुझ्या मुलीसोबत…

अहमदनगर: तू माझ्यासोबत प्रेमसंबंध ठेव नाही तर तुझ्या मुलीसोबत…

Ahmednagar Crime News: तू माझ्यासोबत प्रेमसंबंध ठेव नाही तर तुझ्या मुलीसोबत प्रेम करीन, अशी धमकी देत एका व्यक्तीने अल्पवयीन मुलीचा विनयभंग (Molested) केल्याची धक्कादायक घटना.

person molested a minor girl by threatening to make love with Lee

अहमदनगर: तू माझ्यासोबत प्रेमसंबंध ठेव नाही तर तुझ्या मुलीसोबत प्रेम करीन, अशी धमकी देत एका व्यक्तीने अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याची धक्कादायक घटना गुरुवारी (दि. ३०) नगरमध्ये घडली. अल्पवयीन मुलीने दिलेल्या फिर्यादीवरून आसाराम भानुदास गवारे (हल्ली रा. माळीवाडा, मूळ रा. अशोकनगर, ता. श्रीरामपूर) याच्याविरोधात तोफखाना पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पीडितेची आई व आरोपी गवारे यांचे प्रेमसंबंध होते. त्यामुळे गवारे हा अधूनमधून पीडितेच्या आईकडे घरी येत होता. दोन महिन्यांपूर्वी तो घरी आला व आईशी वाद घालू लागला. त्याने आईकडे प्रेमसंबंध ठेवण्याची मागणी केली. त्यास आईने नकार दिला. त्याचा राग आल्याने त्याने पीडितेच्या आईला शिवीगाळ करत मारहाण केली. ही घटना डिसेंबर २०२२ मध्ये घडली होती. त्यावेळी आईने गवारे याच्याविरोधात तक्रार दिली होती. त्यामुळे तो निघून गेला होता. तो पुन्हा गुरुवारी (दि. ३०) रात्री घरी आला व त्याने घराचा दरवाजा बाहेरून उघडला. दरवाजाचा आवाज झाल्याने पीडिता उठली असता गवारे यांनी पीडितेला उचलून घराबाहेर नेले व लज्जा उत्पन्न होईल, असे कृत्य केले. ही बाब आईच्या लक्षात आल्याने आईने आरोपीच्या तावडीतून मुलीची सुटका केली, असे फिर्यादीत म्हटले आहे.

Web Title: person molested a minor girl by threatening to make love with Lee

See Latest Marathi NewsAhmednagar News, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here