संगमनेर: माहेरून पाच लाख रुपये आणावेत, विवाहितेचा शारिरीक व मानसिक छळ, सहा जणांविरुद्ध गुन्हा
Sangamner Crime: माहेरुन 5 लाख रुपये आणावेत, या कारणासाठी एका विवाहितेचा शारिरीक व मानसिक छळ केल्याप्रकरणी सासरच्या सहा जणांविरुद्ध शहर पोलीस ठाण्यात गुन्हा.
संगमनेर: माहेरुन 5 लाख रुपये आणावेत, या कारणासाठी एका विवाहितेचा शारिरीक व मानसिक छळ केल्याप्रकरणी सासरच्या सहा जणांविरुद्ध शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. पैसे आणण्यासाठी विवाहितेचा छळ केल्याने संगमनेर शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल करण्यात आली आहे.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, धनश्री अमित उदावंत ही 27 वर्षीय महिला धानोरा येथे सासरी नांदत असताना तिने माहेरुन 5 लाख रुपये आणावेत या कारणासाठी तिचा नवरा अमित अशोक उदावंत, सासरा अशोक रामभाऊ उदावंत, सासू अनिता अशोक उदावंत, दीर चेतन अशोक उदावंत (रा. धानोरा, ता आष्टी, जि. बीड), मावस सासू स्वाती राजेंद्र डहाळे, मावस सासरे राजेंद्र डहाळे (रा. दोरा देहरे ता. नगर) यांनी तिचा शारीरिक व मानसिक छळ केला.
अखेर या छळास कंटाळून सदर विवाहीतेने संगमनेर शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. या फिर्यादीवरून पोलिसांनी वरील सहा जणांविरुद्ध गुन्हा रजिस्टर नंबर 421/2023 भारतीय दंड संहिता 498 अ, 323, 504, 506, 34 प्रमाणे दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक भगवान मथुरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक धिंदळे करत आहेत.
Web Title: Physical and mental harassment of married, crime against six persons
See also: Latest Marathi News, Ahmednagar News, Education Study and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App