Home Accident News अकोले ब्रेकिंग: पिकअप दुचाकीचा भीषण अपघातात युवकाचा जागीच मृत्यू

अकोले ब्रेकिंग: पिकअप दुचाकीचा भीषण अपघातात युवकाचा जागीच मृत्यू

Akole News: अकोले देवठाण रस्त्यावरून जातांना पिकअप व दुचाकी वाहनाची समोरा समोर – धडक झाल्याने या भीषण अपघातात (Accident) दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाल्याची  घटना.

youth died on the spot in a horrific accident involving a pickup bike

अकोले: तालुक्यातील अकोले देवठाण रस्त्यावरून जातांना पिकअप व दुचाकी वाहनाची समोरा समोर – धडक झाल्याने या भीषण अपघातात दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाल्याची  घटना आज सकाळी घडली. हेमंत अस्वले रा. विरगाव ता. अकोले असे या अपघात मयत झालेल्या तरूणाचे नाव आहे.

याबाबत माहिती अशी की हेमंत अस्वले हा आपल्या दुचाकी क्र. एमएच १७ बीबी २१ या दुचाकीवरून प्रवास करत असतांना देवठाण अकोले रस्त्यावरून समोरून भरधाव येणाऱ्या पिकअप क्र. एमएच १७ बीवाय ९२३० ने या दुचाकीला जोराची धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की, हेमंत अस्वले हे गाडीवरून उडून रस्त्यावर आदळले. त्यामुळे त्यांच्या डोक्याला गंभीर स्वरूपाची इजा झाली. मेंदूला जबर मार लागल्याने त्यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. याप्रकरणी पोलीसांनी पिकअप व चालकाला ताब्यात घेतले असून गुन्हा दाखल करून पुढील तपास अकोले पोलीस करत आहे.

Web Title: youth died on the spot in a horrific accident involving a pickup bike

See also: Latest Marathi NewsAhmednagar NewsEducation Study and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here