Home अहमदनगर अहमदनगर हादरले! अज्ञात महिलेचा दगडाने ठेचून खून

अहमदनगर हादरले! अज्ञात महिलेचा दगडाने ठेचून खून

Ahmednagar News:  चिकूच्या बागेत एका अज्ञात महिलेचा चेहरा विद्रूप करत खून (Murder) केलेला मृतदेह आढळून आल्याने शिर्डीसह परिसरात मोठी खळबळ.

Ahmednagar Murder case Unidentified woman stoned to death

शिर्डी:  शहरातील पानमळा रस्त्यावरील चिकूच्या बागेत एका अज्ञात महिलेचा चेहरा विद्रूप करत खून केलेला मृतदेह आढळून आल्याने शिर्डीसह परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.

मृत महिलेचा लाल रंगाचा चुडीदार व निळ्या रंगाची लेगीज व पांढरा रंगाची ओढणी नाकात व कानात धातुची रिंग पांढरी स्लिपर असा पेहराव असून असलेल्या महिलेचा मृतदेह २ जुन रोजी मिळून आला असून या घटनेनंतर शिर्डी परीसरात मोठ्या प्रमाणावर खळबळ उडाली आहे

या घटनेची माहिती मिळताच तात्काळ घटनास्थळी शिर्डी विभागाचे उपविभागीय अधिकारी संदीप मिटके,संजय सातव व पोलीस निरीक्षक नंदकुमार दुधाळ यांच्या पथकाने भेट देऊन घटनास्थळाची पाहाणी करून माहिती घेऊन मृतदेहाची ओळख पटवण्यासाठी प्रयत्न सुरू केला आहे. या महिलेचा गळा आवळून खुन झाला असावा व मृतदेहाची ओळख पटु नये यासाठी तिच्या चेहऱ्यावर दगड टाकुन चेहरा छिन्नविछिन्न करण्यात आला असावा असा पोलिसांचा अंदाज आहे.

सदर खून हा रात्रीच्या वेळी झाल्याचा अंदाज आहे. महिलेची ओळख पटविण्याचा पोलिसांचा प्रयत्न सुरू आहे. संदर महिलेची चेहरीपट्टी व पेहराव बघता हि स्थानिक नसावी असा अंदाज व्यक्त केला जात आहे ज्या ठिकाणी सदरची घटना घडली आहे तेथे ओळख पटेल असा कोणता पुरावा मिळुन येतो का..? त्या अनुषंगाने देखील जवळपास असलेल्या बागेत देखील मोठ्या प्रमाणावर काही चिजवस्तु मिळतात का..? यासाठी देखील उशिरा पर्यंत शोध घेण्याचा प्रयत्न सुरू होता ज्या परीसरात हा मृतदेह सापडला आहे त्या रोडकडे येणाऱ्या जवळपास चार पाच रस्त्यावर असलेल्या सीसीटीव्हीच्या माध्यमातून देखील शोध घेण्यासाठी पोलीस पथक प्रयत्न केला आहे.

घटनास्थळाची पहाणी केली असता त्या ठिकाणी. झटापट झाली आहे का तिच्या पायातील चप्पल देखील तशीच दिसून येत असल्याने व तशा खुना दिसत नसल्याने बहुदा तिचा अगोदर गळा आवळून खून झाला असावा व नंतर ओळख पटु नये यासाठी तिच्या चेहऱ्यावर अंदाजे दहा ते १५ किलो वजनाचा दगड अज्ञात आरोपीने टाकला असावा अशी शक्यता देखील पुढे आली असुन संदर महिलेला शिर्डी शहरात कोणी बघितले का या दृष्टीने देखील पोलीस शोध घेत आहे. सदरचा मृतदेह ताब्यात घेऊन तपासणी व शवविच्छेदन करण्यासाठी शवगृहात ठेवण्यात आला आहे. रात्री उशिरा पर्यंत अज्ञात आरोपीच्या विरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते अधिक तपास पोलीस निरीक्षक नंदकुमार दुधाळ यांच्या मार्गदर्शनाखाली शिर्डी पोलीस करीत आहे.

Web Title: Ahmednagar Murder case Unidentified woman stoned to death

See also: Latest Marathi NewsAhmednagar NewsEducation Study and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here