Home क्राईम संगमनेर जोर्वे नाका दंगलप्रकरणी आरोपींच्या पोलीस कोठडीत वाढ

संगमनेर जोर्वे नाका दंगलप्रकरणी आरोपींच्या पोलीस कोठडीत वाढ

Sangamner Crime:  १६ आरोपींच्या पोलीस कोठडीत (police custody ) ५ जूनपर्यंत वाढ करण्यात आली आहे.

police custody of accused in Jorve Naka riot case

संगमनेर : शहरातील नासिक-पुणे महामार्गावर असलेल्या जोर्वे नाका येथे रविवारी रात्री झालेल्या हाणामारी आणि दंगल प्रकरणी पोलिसांनी १६  आरोपींच्या पोलीस कोठडीत न्यायालयाने ५ जून पर्यंत वाढ केली आहे.

सुरुवातीला पकडलेल्या 16 आरोपीची पोलीस कोठडीची मुदत शुक्रवारी संपल्यानंतर त्यांना न्यायालयासमोर उभे केले. असता पोलिसांच्यावतीने सरकारी वकील मिराज पर्बत यानी जोरदार व्यक्तिवाद करत आरोपीच्या पोलीस वाढ करण्याची मागणी केली. आरोपींच्या वकिलाचा आणि सरकारी वकिलांचे म्हणणे ऐकल्यानंतर न्यायालयाने आरोपीच्या कोठडीत आणखी वाढ केली.

नईम कादर शेख, रेहान गुलफान पठाण, रोहबाज याकूब शेख, मोबीन मुबारक शेख, नफीस अनिस पठाण, अमीर रफिक शेख, इमान उस्मान पठाण, तौफिक शफिक शेख इस्माईल निसार पठाण, अबुजर बिलाल शेख, अलताफ मुस्तफा अन्सारी, सलमान साजिद शेख, अमजद गुलामनबी शेख, शकील नासीर पठाण, शेहबाज गफार शेख व अहद सय्यद आद अन्सार यांना 5 जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावली

रविवारी रात्री जोर्वे नाका येथे झालेल्या वादातून काही नागरिकांवर प्राणघात हल्ल्याचा प्रयत्न झाला. धारदार शस्त्राचा वापर करत दहशत माजविण्याचा प्रयत्न झाला. गुन्हेगारांनी थेट कायदा व सुव्यवस्थेला आव्हान देत अशांतता निर्माण केल्याने पोलीस निरीक्षक भगवान मथुरे यांनी या प्रकाराची गंभीर दखल घेत तातडीने आरोपीविरोधात गुन्हा दाखल करून तपास सुरू केला होता. यामुळे शहरातील व परिसरातील ग्रामीण भागातील गावामध्ये तणाव सदृश्य परिस्थिती निर्माण झाली होती. पोलीस यंत्रणेने वेळीच परिस्थितीवर नियंत्रण मिळविले होते. याप्रकरणी पोलीस निरीक्षक भगवान मथुरे अधिक तपास करत आहेत.

Web Title: police custody of accused in Jorve Naka riot case

See also: Latest Marathi NewsAhmednagar NewsEducation Study and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here