Home क्राईम संगमनेर: महिलेचा विनयभंग, तु माझ्या सोबत चल असे म्हणत….

संगमनेर: महिलेचा विनयभंग, तु माझ्या सोबत चल असे म्हणत….

Sangamner Crime:  घरासमोर येऊन तु माझ्या सोबत चल असे म्हणत तिचा हात ओढला. त्यास नकार दिल्याने आरोपीने या महिलेला लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन करत तिचा विनयभंग (Molested) केल्याची घटना.

Molested a woman, saying you come with me

संगमनेर: आरोपी फिर्यादीच्या घरासमोर येऊन तु माझ्या सोबत चल असे म्हणत तिचा हात ओढला. त्यास नकार दिल्याने आरोपीने या महिलेला लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन करत तिचा विनयभंग केला. तसेच या महिलेला मारहाण केली. ही घटना काल गुरूवारी दुपारी दीड वाजेच्या सुमारास शहरातील अकोले नाका परिसरात घडली.

याबाबत शहर पोलीसांनी दिलेली माहिती अशी की,  फिर्यादी महिला ही तीच्या अकोले नाका परिसरातील घरी  असतांना आरोपी राजू सोमनाथ दिघे हा दुपारी दीडच्या सुमारास या महिलेच्या घरी आला. यावेळी त्याने फिर्यादी महिलेचा हात धरून माझ्या बरोबर चल असे म्हणत लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन केले. यावेळी या महिलेने आरडाओरडा केला असता आरोपी राजू दिघे याने या महिलेच्या तोंडावर चापटीने मारहाण करत कोणालाही काही सांगितले तर जीवे ठार करील अशी धमकी दिली. याप्रकरणी फिर्यादी महिलेच्या तक्रारीवरून आरोपी विरोधात शहर पोलीसांनी गुन्हा दाखल केला आहे.

Web Title: Molested a woman, saying you come with me

See also: Latest Marathi NewsAhmednagar NewsEducation Study and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here