Home संगमनेर Accident: संगमनेर नशिक पुणे महामार्गावर पिकअप पलटी, अपघातात दुचाकीस्वार…

Accident: संगमनेर नशिक पुणे महामार्गावर पिकअप पलटी, अपघातात दुचाकीस्वार…

Sangamner Accident News:  आंबी फाट्यानजीक पिकअपचा अपघात, दुचाकीस्वार गंभीर जखमी.

 

Sangamner | संगमनेर: संगमनेर तालुक्याच्या पठार भागातील पुणे नाशिक राष्ट्रीय महामार्गावरील आंबीखालसा फाट्यानजीक पिकअपने विरुद्ध बाजूने येणाऱ्या दुचाकीस्वाराला वाचविण्याच्या प्रयत्नात दुचाकीला धडक बसल्याने पिकअप महामार्गावर उलटल्याची घटना गुरूवार दिनांक २१ जुलै रोजी सायंकाळी साडेपाच वाजेच्या दरम्यान घडली. या अपघातात दुचाकी स्वार जखमी झाला आहे.

याबाबत महामार्ग पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, किशोर आढाव राहणार सायखेडा नाशिक हे त्यांच्या ताब्यातील पिकअप (क्रमांक एम एच १५ इ जी) ही घेऊन आळेफाट्याकडून नाशिकच्या दिशेने चालले होते. गुरुवारी सायंकाळी साडेपाच वाजेच्या दरम्यान ते आंबीखालसा परीसरात आले असता नारायण रामदास भागवत हे त्यांच्या ताब्यातील दुचाकी (क्रमांक एम एच १४ एच इ ६८७१) ही घेऊन विरुद्ध दिशेने चालले होते. त्याच दरम्यान पिकअप व दुचाकींची धडक होऊन पिक अप महामार्गावर उलटली तरी दुचाकीचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या अपघातात भागवत हे जखमी झाले.

या घटनेची माहिती मिळताच स्थानिक ग्रामस्थांनी जखमीला खासगी रुगणवाहीकेतून आळेफाटा येथील खाजगी रुग्णालयात पाठवले. घारगाव पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक सातपुते, पोलीस हेडकॉन्स्टेबल भुतांबरे , पोलीस नाईक गणेश लोंढे यांनी वाहतूक व्यवस्था सुरळीत सुरू केली. दरम्यान महामार्ग पोलिस मदत केंद्राचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली योगीराज सोनवणे, मनेश शिंदे ,बर्डे, उमेश गव्हाने आदी घटनास्थळी दाखल झाले.

Web Title: Pickup overturned on Nashik Pune highway, bike rider in accident

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here