संगमनेर: वाळू कारवाईतील पोलीस वसाहतीमधील पिकअप चोरीला, दोघांवर गुन्हा
Sangamner Crime: शहरातील जुन्या पोलिस वसाहतीमध्ये उभी असलेली ही पिकअप दोघांनी चोरून नेल्याची घटना.
संगमनेर: संगमनेर शहरातील जुन्या पोलिस वसाहतीमध्ये उभी असलेली ही पिकअप दोघांनी चोरून नेल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी त्यांच्याविरोधात सोमवारी संगमनेर शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, वाळूची अवैधरित्या वाहतूक होत असलेली विना क्रमाकांची पीकअप महसूल विभागाने कारवाईत जप्त केलेली होती. त्यात एक ब्रास वाळू होती. २५ ऑक्टोबर सकाळी ७. ३० ते २७ नोव्हेंबर सकाळी ११.३० वाजेच्या सुमारास पिकअप चोरीची घटना शहरातील जुन्या पोलिस वसाहतीमध्ये घडली आहे.
बाबाजी किसन जेडगुले (मंडलाधिकारी, संगमनेर बुद्रुक) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. मोहन बारकू भोकनळ, शिवाजी राधाकिसन घुले (दोघेही रा. मंगळापूर, ता. संगमनेर) अशी गुन्हा दाखल झालेल्या दोघांची नावे आहेत. याप्रकरणी शहर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक भगवान मथुरे यांच्या मार्गदर्शनाखाली टोपे हे अधिक तपास करीत आहे.
Web Title: Pickup stolen from police colony in sand operation, crime against two
See also: Latest Marathi News, Sangamner News, Ahmednagar News, Education Study, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App