Home अकोले दुधाच्या दराच्या प्रश्नांवर शरद पवारांचे आंदोलकांना आवाहन, दुध रस्त्यावर ओतून…..

दुधाच्या दराच्या प्रश्नांवर शरद पवारांचे आंदोलकांना आवाहन, दुध रस्त्यावर ओतून…..

Ahmednagar News: दुध रस्त्यावर ओतून आणखी नुकसान करून घेऊ नये – शरद पवार (Sharad Pawar).

Sharad Pawar's appeal to the protesters on milk price issues

अहमदनगर: गेल्या काही दिवसांपासून दुधाच्या दराच्या प्रश्नांवर डॉ. अजित नवले व इतर कार्यकर्त्यांची बेमुदत उपोषण सुरू आहे. महाराष्ट्र शासनाने दिनांक १४ जुलै २०२३ रोजी अध्यादेश काढून गाईच्या दूधाला किमान ३४ रुपये प्रति लिटर निश्चित करूनही सदर आदेशाचे पालन दूध संघांकडून होत नाही असे दिसते. या संदर्भात शासनाने तातडीने कारवाई करणे आवश्यक आहे. व त्यासाठी दूध संघानेही सहकार्य करावे.

उपोषणकर्ते शेतकरी नेते डॉ. अजित नवले व त्यांच्या सहकाऱ्यांना आवाहन की त्यांनी प्रकृतीची काळजी घ्यावी, उपोषण मागे घ्यावे. शासनाबरोबर चर्चेतून आपण मार्ग काढू. दूध उत्पादक शेतकरी बांधवांना देखील विनंती की, त्यांनी दूधासारखा नाशवंत माल रस्त्यावर ओतून आणखी नुकसान करून घेऊ नये. राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनी या प्रश्नाकडे कृपया लक्ष देऊन तातडीने दूध दरवाढीचे अंमलबजावणी करून घ्यावी.

दूध दरासंबंधीचा सरकारचा अध्यादेश सर्व दूध संघांनी धुडकावून लावला आहे. त्यानंतर दुग्धविकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी शेतकरी प्रतिनिधी व दूध संघांचे प्रतिनिधी यांच्यासमवेत बैठक घेतली. परंतु त्या बैठकीत काहीच तोडगा निघाला नाही. त्यामुळे किसान सभेचे राज्य सरचिटणीस डॉ. अजित नवले अकोले तहसिलदार कचेरीसमोर इतर दूध उत्पादक शेतकऱ्यांसोबत बेमुदत उपोषणाला बसले आहेत. उपोषणाला बसलेल्या शेतकऱ्यांच्या उपोषणाचा हा ६ वा दिवस आहे. दुधाचा प्रश्न ऐरणीवर आला असून, हे बेमुदत उपोषण लवकर समाप्त करण्यासाठी राज्य सरकारने विशेष प्रयत्न करावेत, अन्यथा राज्यभर तीव्र आंदोलन करण्यात येईल हा इशारा किसान सभेने दिला आहे.

Web Title: Sharad Pawar’s appeal to the protesters on milk price issues

See also: Latest Marathi NewsSangamner NewsAhmednagar NewsEducation Study, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here