Home संगमनेर संगमनेर तालुक्यात वरवंडी येथे पोलिसांना मारहाण

संगमनेर तालुक्यात वरवंडी येथे पोलिसांना मारहाण

Police beaten at Varwandi in Sangamner taluka

संगमनेर | Sangamner: संगमनेर तालुक्यातील वरवंडी ग्रामपंचायत सरपंच व उपसरपंच निवडणुकीदरम्यान बंदोबस्त करण्यासाठी आलेल्या पोलीस उप निरीक्षकासह पोलिसांना जमावाकडून शिवागाळ व धक्काबुकी करण्यात आल्याने १३ जणांना अटक करण्यात आली आहे.

त्यांच्याविरुद्ध सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत आश्वी पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक नयन पाटील यांनी फिर्याद दिली असून या फिर्यादीनुसार वरवंडी ग्रामपंचायतीच्या सरपंच व उपसरपंच यांच्या निवडणूकप्रसंगी दोन गटांत उमेदवार पळवापळवी सुरु झाल्याने गावात तणावयुक्त वातावरण निर्माण होऊ नये यासाठी पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवाला होता. मात्र पोलीस आपल्याला अडकाठी निर्माण करीत असल्याचे पाहून अशोक रोहिदास गागरे व राजाबापू नानासाहेब वर्पे यांनी तणाव निर्माण करत पोलीस उपनिरीक्षक व पोलिसांना दमदाटी व शिवीगाळ करत धक्काबुकी करण्यात आली.

याबाबत १३ जणांना अटक करण्यात आली आहे. सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी, दमदाटी शिवीगाळ, धक्काबुकी केल्याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  

Web Title: Police beaten at Varwandi in Sangamner taluka

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here