Home राहाता व्यापाऱ्यास मारहाण करीत लाखो रुपयांना लुटले

व्यापाऱ्यास मारहाण करीत लाखो रुपयांना लुटले

Rahata beat up a trader and looted Lacks of rupees

राहता | Rahata: राहता तालुक्यातील बाभळेश्वर येथे लोणी रस्त्यालगत असलेल्या भुसार मालाच्या व्यापाऱ्यास अज्ञात चार ते पाच चोरट्यांनी मारहाण करत दुकानातील दोन ते तीन लाख रुपये लुटून नेल्याची घटना घडली आहे.

ही घटना गुरुवारी सायंकाळी साडे सहा वाजेच्या सुमारास घडली. याप्रकरणी २४ तास उलटूनही कुठल्याही प्रकारचा गुन्हा दाखल न झाल्याने नागरिकांतून आश्चर्य व्यक्त होत आहे. दिवसाढवळ्या या घटना घडत असल्याने खळबळ उडाली आहे.

बाभळेश्वर येथे लोणी रस्त्यावर जोगेश्वरी ट्रेडिंग नावाचे भुसार मालाचे दुकान आहे. गुरुवारी सायंकाळी साडे सहा वाजेच्या सुमारास अज्ञात चार ते पाच जणांनी दुकानात प्रवेश करत भुसार मालाच्या व्यापाऱ्यास मारहाण करीत त्याच्याजवळील दोन ते तीन लाख रुपयांची रक्कम घेऊन पोबारा केला आहे.

या घटनेबाबत लोणी पोलीस ठाण्याशी संपर्क साधला असता या प्रकारात आम्हाला शंका असल्याने गुन्हा दाखल केला नाही असे उत्तर मिळाले.

Web Title: Rahata beat up a trader and looted Lacks of rupees

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here