Home Accident News पोलीस कर्मचारी यांचा अपघातात मृत्यू

पोलीस कर्मचारी यांचा अपघातात मृत्यू

Police Constable Accident Death  

पाथर्डी | Accident News:  माळेगाव येथील पोलीस कर्मचारी संपत रतन एकशिंगे यांचे पागोरी पिंपळगाव शिवारात मंगळवारी चार वाजेच्या सुमारास अपघाती निधन झाले. यामुळे परिसरात शोककळा पसरली आहे.

संपत एकशिंगे हे सध्या बोधेगाव ता. शेवगाव येथे पोलीस कर्मचारी म्हणून काम करीत होते. मंगळवारी कोरडगाव येथून पागोरी पिंपळगाव येथे सेवा सहकारी संस्थेची कर्जाची रक्कम भरण्यासाठी एकशिंगे हे स्विफ्ट गाडीतून जात होते. रस्त्यावर असलेल्या खड्ड्यांमुळे चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटले. गाडी रस्त्याच्या खाली गेली. गाडीने दोन तीन पलटी घेतल्याचे स्थानिक नागरिकांनी सांगितले. या अपघातात एकशिंगे यांचा जागीच मृत्यु झाला. पाथर्डी उपजिल्हा रुग्णालयात शावविचेदन करण्यात आले. मंगळवारी रात्री एकशिंगे यांच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यात आले. माळेगाव येथील नागरिकांमध्ये शोककळा पसरली आहे.

Web Title: Police Constable Accident Death  

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here