Home संगमनेर संगमनेर: पोलीस हवालदाराने शक्कल लढविली आणि चोर जाळ्यात

संगमनेर: पोलीस हवालदाराने शक्कल लढविली आणि चोर जाळ्यात

बोटा येथील घटना | Sangamner Theft : मौजमजेसाठी करत होते डाळिंबाची चोरी.

police constable fought and caught the theft

संगमनेर: घारगाव येथील  डाळिंब उत्पादक शेतकऱ्याच्या बागेतील विक्रीस आलेले डाळिंब चोरट्यांनी तोडत चोरून नेले होते. याबाबत घारगाव पोलीस ठाण्यात यशवंत कारभारी शेळके यांच्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलीस हवालदार कैलास देशमुख यांनी तत्काळ तपास सुरू करून संशयितांना ताब्यात घेतले असता चौकशी दरम्यान मौजमजेसाठी आम्ही डाळिंब चोरल्याची कबुली या चोरट्यांनी दिली आहे.

रोहित खंडू नंदकर वय १९, शैलेश हरिभाऊ नंदकर वय १९ (दोघेही रा. नळावणे ता. जुन्नर, जि. पुणे), समीर रोहिदास बांबळे वय १९ (रा. बांबळेवाडी, डोळासने, ता. संगमनेर ) असे डाळिंब चोरी करणाऱ्यांची नावे आहेत.

याबाबत घारगाव पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, बोटा येथेयशवंत शेळके यांनी शेतात डाळिंबाची लागवड केली आहे. तोडणीला आलेले डाळिंब चोरट्यांनी अंधाराचा फायदा घेत मंगळवारी (दि. १६) रात्री सात ते बुधवारी (दि.१७) सकाळी सव्वासहा वाजेच्या दरम्यान डाळिंब चोरून नेले होते. शेळके हे बागेत गेले असता तोडणीला आलेले डाळिंब चोरी गेल्याचे निदर्शनास येताच त्यांनी पोलिसांना कळविले.

पोलीस हवालदार देशमुख यांनी घटनास्थळी येऊन डाळिंब चोरी व्यापाऱ्याने सांगितले. गेल्याची खात्री केली. सुमारे २५ कॅरेट डाळिंब चोरी गेल्याचे शेळके यांनी पोलिसांना सांगितले. त्यांनी दिलेल्या फिर्यादी वरून घारगाव  अज्ञात चोरट्यांविरूद्ध गुन्हा दाखल केला होता.

दरम्यान, बुधवारी सकाळी हवालदार देशमुख हे यशवंत शेळके, उपसरपंच पांडू शेळके, पोलीस पाटील शिवाजी शेळके यांना सोबत घेऊन आळेफाटा (जि. पुणे) येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत गेले. तेथील व्यापाऱ्यांना विचारपूस केली असता, गोण्यांमध्ये आणलेले डाळिंब विकून तिघेजण चेक घेऊन गेल्याचे एका व्यापाऱ्याने सांगितले.

पोलिसी खाक्या दाखवताच केवळ मौजमजेसाठी आम्ही डाळिंबाची चोरी केली असल्याचे त्यांनी सांगितले.

असे पकडले चोर

हवालदार देशमुख यांनी युक्ती लढवली. व्यापाऱ्यास सांगितले, चोरांना फोन करून सांगा तुमची पट्टी चुकलेली आहे, तुमचे पैसे वाढत आहेत ते घेऊन जा. व्यापायाने असे सांगताच वरील दोघे पुन्हा चेक नेण्यासाठी आले असता पोलिसांनी त्यास ताब्यात घेतले.

Web Title: police constable fought and caught the theft

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here