Home अकोले ‘अगस्ती’ निवडणूक; शेतकरी समृध्दीला दिलासा, तिढा सुटण्याची शक्यता

‘अगस्ती’ निवडणूक; शेतकरी समृध्दीला दिलासा, तिढा सुटण्याची शक्यता

Ahmednagar | Akole Agasti Karkhana Election: सरकारपक्षाने १० दिवसांत बाजू मांडावी. तसे न झाल्यास न्यायालय ३० ऑगस्टला निर्णय देणार.

Akole Agasti Karkhana Election Relief to Shetkari Samruddhi

अकोले: अगस्ती कारखान्याच्या निवडणुकीचा तिढा येत्या दहा दिवसांत सुटण्याची शक्यता असून, गुरुवारी अगस्ती निवडणुकीसंदर्भात शेतकरी समृद्धी मंडळाने दाखल केलेल्या याचिकेवर औरंगाबाद खंडपीठात सुनावणी झाली.

रवींद्र व्ही. घुगे, अरुण आर. पेडणेकर यांच्या खंडपीठासमोर शेतकरी समृद्धी पॅनलच्या वतीने विधिज्ञ आर. एन. धोरडे, अनिकेत चौधरी यांनी न्यायालयात बाजू मांडली.

शिंदे – फडणवीस सरकारने पावसाचे कारण देत सहकारातील निवडणुका ३० सप्टेंबरपर्यंत स्थगित केल्या. याबाबत अगस्ती कारखान्याच्या निवडणुकीसंदर्भात शेतकरी समृद्धी

मंडळाचे नेते सीताराम गायकर यांच्या मार्गदर्शनाखाली १६ जुलैला म्हणजे बरोबर महिन्यापूर्वीच याचिका दाखल केली होती. या याचिकेवर गुरुवारी सुनावणी झाली.

अकोले तालुक्यातील सहकारातील निवडणूक स्थगित होते; मात्र अधिक पावसाच्या प्रदेशात तालुक्यातील ४२ गावांमध्ये ग्रामपंचायत निवडणुका जाहीर झाल्या आहेत. या सरकारच्या निर्णयावर सरकारपक्षाने १० दिवसांत बाजू मांडावी. तसे न झाल्यास न्यायालय ३० ऑगस्टला निर्णय देणार असल्याचे समजते.

Web Title: Akole Agasti Karkhana Election Relief to Shetkari Samruddhi

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here