संगमनेरातील अवैध कत्तलखान्यावर पोलिसांचा छापा
Breaking News | Sangamner: अवैध कत्तलखान्यावर छापा (Raid) टाकून २ हजार ५०० किलो गोमांस व इतर एक हजार रुपयांचा मुद्देमाल असा एकूण ५ लाख १ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत.
संगमनेर: येथील उपविभागीय पोलीस अधिकारी सोमनाथ वाघचौरे यांच्या पथकाने सोमवार दि. २२ एप्रिल रोजी रात्री अकरा वाजता संगमनेर शहरातील मदिनानगर येथील अवैध कत्तलखान्यावर छापा टाकून २ हजार ५०० किलो गोमांस व इतर एक हजार रुपयांचा मुद्देमाल असा एकूण ५ लाख १ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.
याबाबत शहर पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी, उपविभागीय पोलीस अधिकारी सोमनाथ वाघचौरे यांना गोपनीय माहिती मिळाली की, मदिनानगर येथे गोवंश जनावरांची कत्तल होत आहे. त्यानुसार पथकाला कारवाईचे आदेश दिले. पथकातील पोना. राहुल डोके व पोकॉ. राहुल सारबंदे यांनी रात्री ११ वाजता छापा टाकला असता दोन नंबर गल्ली येथील पत्र्याच्या शेडच्या आडोशाला जाऊन खात्री केली असता तिघेजण गोवंश जातीच्या जनावरांची कत्तल करताना दिसून आले. यातील दोघांना पकडले तर एकजण पळून जाण्यात यशस्वी झाला. याप्रकरणी पोकॉ. राहुल सारबंदे यांनी शहर पोलिसांत दिलेल्या फिर्यादीवरून सलीम जान महंमद कुरेशी (वय १९,रा. सुभाषनगर कोपरगाव, हल्ली रा. मदिनानगर संगमनेर), कैश अशपाक कुरेशी (वय २२, रा. मदिनानगर, संगमनेर) व पळून गेलेला काशिफ असद कुरेशी (रा. मदिनानगर, संगमनेर) यांच्यावर भादंवि कलम २६९, ४२९ महाराष्ट्र पशु संरक्षण (सुधारणा) अधिनियम सन १९९५ चे सुधारीत सन २०१५ चे कलम ५ (क), ९ नुसार गुन्हा दाखल केला असून, कारवाईत ५ लाख रुपयांचे २ हजार ५०० किलो वजनाचे गोमांस आणि १००० रुपये किमतीच्या दोन लाकडी दांडे असलेल्या कुऱ्हाडी, एक चाकू व एक टोचा असा एकूण ५ लाख १ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. यात अटक केलेल्या दोघांना न्यायालयासमोर हजर केले असता चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
Web Title: Police raid illegal slaughterhouse in Sangamner
See also: Latest Marathi News, Breaking News live, Education Study