Home अहमदनगर अहमदनगर: शेतात काम करत असताना तरुणाचा घोणस या सापाने घेतला जीव

अहमदनगर: शेतात काम करत असताना तरुणाचा घोणस या सापाने घेतला जीव

Breaking News | Ahmednagar: २३ वर्षीय तरुणाचा सर्पदंशाने मृत्यू झाल्याची घटना.

young man was bitten by a snake while working in the field

राहुरी:  राहुरी तालुक्यातील तांदुळवाडी येथील जयदीप बाळासाहेब चव्हाण या २३ वर्षीय तरुणाचा सर्पदंशाने मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.

चार दिवसांपूर्वी शेतामध्ये काम करत असताना त्याला विषारी घोणस या सापाने पायाला चावा घेतला होता. त्याला उपचारासाठी नगर येथील खासगी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. उपचारादरम्यान त्याचा अखेर मृत्यू झाला. मयत जयदीप हा दुग्ध व्यवसाय करत होता. अल्पावधीत त्याने कष्टाने व मेहनतीने चांगला नावलौकिक व मित्र परिवार मिळविला होता. त्याच्या पश्चात आई, आजी, दोन बहिणी, चुलते असा मोठा परिवार आहे. या घटनेमुळे गावात हळहळ व्यक्त केली जात आहे.

दरम्यान, सध्या वातावरणात भयंकर उकाडा व उष्णता असल्याने सर्प शेतात गारव्याच्या ठिकाणी आश्रय घेत असतात. घोणस हा अत्यंत विषारी सर्प असून या सर्पाचा रंग माती सारखा असल्याने हा सर्प घासाच्या बुडाखाली व गिन्ही गवताच्या बेटाखाली गारव्याला असतो. शेतात काम करताना अनेक वेळा निदर्शनास पडतो. माती सारखा रंग असल्याने काम करणाऱ्याच्या लक्षात येत नसल्याने सर्पदंशाच्या घटना ग्रामिण भागात घडतात. त्यामुळे शेतात जनावरांचा चारा काढताना शेतकऱ्यांनी काळजी घेणे गरजेचे आहे.

Web Title: young man was bitten by a snake while working in the field

See also: Latest Marathi News,  Breaking News live,  Education Study

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here