Home संगमनेर संगमनेर: चोरून वाळूची वाहतूक करणारा पिकअप पकडला

संगमनेर: चोरून वाळूची वाहतूक करणारा पिकअप पकडला

Breaking News | Sangamner: चोरून वाळूची वाहतूक करणारा विना क्रमांकाचा पिकअप, १ लाख ५२ हजारांचा मुद्देमाल केला जप्त.

pick-up truck transporting sand was caught by stealth

संगमनेर: सतत कारवाया करूनही वाळूचोरी काही थांबण्याचे नाव घेईना. चोरुन वाळूची वाहतूक करणारा पिकअप उपविभागीय पोलीस अधिकारी सोमनाथ वाघचौरे यांच्या पथकाने कोकणगाव शिवारात सोमवार दि. २३ एप्रिल रोजी दुपारी तीन वाजेच्या सुमारास पकडला. या कारवाईत पोलिसांनी १ लाख ५२ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

याबाबत संगमनेर तालुका पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी, उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांचे पथक कोकणगाव शिवारातील निझर्णेश्वर शिवारात असताना त्यांना चोरून वाळूची वाहतूक करणारा विना क्रमांकाचा पिकअप दिसला. त्याला पकडले असता दोन हजार रुपये किमतीची अर्धा ब्रास वाळू मिळून आली. या कारवाईत पोलिसांनी दीड लाख रुपयांचा पिकअप आणि दोन हजार रुपयांची वाळू, असा एकूण १ लाख ५२ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

याप्रकरणी पोहेकॉ. शांताराम मालुंजकर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून तालुका पोलिसांनी दिसला चालक लक्ष्मण बाळासाहेब मोरे (रा. रहिमपूर, ता. संगमनेर) याच्यावर चोरीचा गुन्हा दाखल झाला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक देवीदास ढुमणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोहेकॉ. एस. आर. बढे करत आहेत.

Web Title: pick-up truck transporting sand was caught by stealth

See also: Latest Marathi News,  Breaking News live,  Education Study

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here