Home पुणे महावितरणच्या महिला टेक्निशियनवर कोयत्याने वार; कारण ठरलं…

महावितरणच्या महिला टेक्निशियनवर कोयत्याने वार; कारण ठरलं…

Breaking News | Baramati Crime: महावितरणच्या महिला टेक्निशियनवर कोयत्याने वार केल्याची घटना समोर.

woman technician of Mahavitaran was stabbed with a spear

बारामती : बारामती तालुक्यातील मोरगाव येथून धक्कादायक घटना समोर आली आहे. महावितरणच्या  महिला टेक्निशियनवर कोयत्याने वार केल्याची घटना समोर आली आहे.  लाईट बिल जास्त येत आहे अशी तक्रार करून दखल न घेतल्याने वार केले आहे. रिंकू पिटे असं या महावितरणच्या  महिला टेक्निशियनचं नाव आहे. अभिजित पोतेने कोयत्याने वार केले आहेत.

या कोयत्या हल्ल्यात रिंकू पिटे यांनी आपला जीव वाचवण्याचा प्रयत्न केला. मात्र कोयता दिसल्याने त्या घाबरल्या आणि अभिजितने त्यांच्यावर सपासप वार केले. या घटनेत रिंकू पिटे यांची प्रकृती चिंताजनक आहे. त्यांना उपचारासाठी पुण्यातील रुग्णालयात पाठवण्यात आलं आहे. आरोपीवर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु आहे.

काही दिवसांपूर्वी अशीच घटना समोर आली होती.  कोयता, सत्तूराचे वार करीत कॉलेजमध्ये शिकणाऱ्या मुलाचा निर्घृण खून केला होता. कारखेल येथील विनोद भोसले या युवकाचा या घटनेत मृत्यू झाला होता. कॉलेजमधून घरी कारखेलला निघालेल्या युवकावर चार ते पाच जणांनी हल्ला केला होता. या हल्ल्यात युवक चांगलाच गंभीर जखमी झाला. यात त्याचा मृत्यू झाला होता. उंडवडीच्या बसस्थानकावर उतरलेल्या विनोद यास कारखेलमधीलच चार ते पाच जणांनी कोयता आणि कुऱ्हाडीने अनामुष वार करून गंभीर जखमी केलं होती. ही घटना ताजी असताना महावितरणच्या  महिला टेक्निशियनवर कोयत्याने वार केल्याची घटना घडली आहे. या घटनेने बारामती हादरली आहे.

Web Title: woman technician of Mahavitaran was stabbed with a spear

See also: Latest Marathi News,  Breaking News live,  Education Study

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here