Home संगमनेर संगमनेर तालुक्यात वेश्याव्यवसाय चालविणाऱ्या लॉजवर पोलिसांचा छापा

संगमनेर तालुक्यात वेश्याव्यवसाय चालविणाऱ्या लॉजवर पोलिसांचा छापा

Sangamner Prostitution Business:   खुलेआम वैश्याव्यवसाय चालविणाऱ्या तालुक्यातील वडगाव एका हॉटेलवर काल श्रीरामपूर येथील पोलीस उप अधीक्षक संदीप मिटके यांच्या पथकाने छापा या छाप्यामध्ये पोलिसांनी तीन महिलांना पकडले.

Police raids lodges operating prostitution Business in Sangamner

संगमनेर:  गेल्या अनेक महिन्यांपासून खुलेआम वैश्याव्यवसाय चालविणाऱ्या तालुक्यातील वडगाव एका हॉटेलवर काल श्रीरामपूर येथील पोलीस उप अधीक्षक संदीप मिटके यांच्या पथकाने छापा या छाप्यामध्ये पोलिसांनी तीन महिलांना पकडले. पुरुष मात्र पळून जाण्यात यशस्वी झाले. तालुक्यातील वडगाव पान- निळवंडे गावाच्या सीमारेषेवर असलेल्या या हॉटेलमध्ये वेश्या व्यवसाय चालत असल्याची दबकी चर्चा होती. याबाबत माहिती मिळाल्यानंतर स्थानिक पोलिसांसह श्रीरामपूर येथील सुरू आहे. पोलीस उपाधिक्षक संदीप मिटके यांच्या पथकाने काल सायंकाळी या हॉटेलवर छापा टाकला. अतिशय गुप्त पद्धतीने हा छापा टाकण्यात आला. या हॉटेलमध्ये काही परप्रांतीय महिला आढळल्या. पोलिसांनी त्यांची सुटका केली. याबाबत रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्यात आलेला नव्हता. वडगाव पान हॉटेल संगमनेर शहरातील एका जबाबदार पदाधिकाऱ्याचे ठेवून दिला आहे या हॉटेलमध्ये पाचशे रुपयांपासून दीड हजार रुपये पर्यंत रक्कम घेऊन वेश्या व्यवसाय सुरु आहे.

बाहेर तालुक्यातील अनेक महिला या ठिकाणी येऊन शरीर विक्री व्यवसाय करतात. तालुका पोलिसांचे मात्र याकडे सोयीस्कर दुर्लक्ष झालेले आहे. काल मोठी कारवाई होऊनही तालुका पोलिसांना याची माहिती नव्हती याबाबत माहिती घेण्यासाठी संपर्क साधला असता परिश्रम घेऊन केली. आमच्याकडे कोणतीही माहिती या उपलब्ध नसल्याचे सांगून संबंधित ठाणे अंमलदाराने फोन ठेवून दिला.

या छाप्यामध्ये हॉटेलमधून काही बंगाली महिलांची सुटका करण्यात आली आहे. मात्र, एक देखील व्यक्ती पोलिसांच्या हाती लागला नाही. यात अद्याप कोणाला आरोपी करण्यात आले नाही. पोलीस कर्मचारी नितीन शिरसाठ यांनी दिलेल्या माहितीनुसार ही कारवाई पोलीस अधिकारी भोसले, पोलीस अधिकारी ठाकरे, कर्मचारी औटी, मेटकर, रोकडे यांनी परिश्रम घेतले.

हॉटेलचे चालक, जागा मालक, लॉज चालविणारा यांचा शोध घेऊन त्यांच्याविरुद्ध कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांमधून केली जात आहे.

Web Title: Police raids lodges operating prostitution Business in Sangamner

See Latest Marathi NewsAhmednagar News, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here