Home अहमदनगर पतंग उडविताना इमारतीवरून कोसळला, तरुणाचा मृत्यू

पतंग उडविताना इमारतीवरून कोसळला, तरुणाचा मृत्यू

Ahmednagar Accident: पत्र्यावर पाय पडल्याने कोसळला, उपचारादरम्यान घेतला अखेरचा श्वास.

young man died when he fell from a building while flying a kite

श्रीरामपूर: मकरसंक्रांतीच्या दिवशी रविवारी (दि. १५) शहरातील मोरगे वस्ती भागामध्ये पतंग उडविताना इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरून तोल जाऊन खाली कोसळलेल्या तरुणाचा सोमवारी अहमदनगर येथील खासगी रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. मयताचे नाव भूषण शरद परदेशी (वय २२) असे आहे.

रविवारी सायंकाळी पाच वाजेच्या दरम्यान तो जखमी झाला होता. मित्रांसमवेत गच्चीवरून पतंग उडवित असताना तोल जाऊन इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरून तो खाली झाला. जमिनीवर कोसळला. यात त्याला गंभीर दुखापत झाली होती. शहरात मकरसंक्रांतीच्या दिवशी रविवारी पतंग उडविण्यासाठी तरुणांची गर्दी उडाली

होती. पोलिसांनी स्पीकर लाऊन पतंग उडविण्याचा आनंद घेणाऱ्या नागरिकांनी खबरदारी घ्यावी, अशी मागणी काही नागरिकांनी केली होती.

पत्र्यावर पाय पडल्याने कोसळला

पतंग उडविताना शहरात घडलेल्या या घटनेमुळे हळहळ व्यक्त होत आहे. इमारतीला लिफ्ट लावण्यासाठी सोडलेल्या जागेवर एक पत्रा बसविलेला होता. त्या पत्र्यावर पाय पडल्यानंतर तो निसटून भूषण हा जमिनीवर कोसळल्याची माहिती स्थानिकांनी दिली. जखमी भूषणला प्रारंभी शहरातील साखर कामगार रुग्णालयात उपचाराकरिता स्थानिक लोकांनी हलविले होते. मात्र तेथे प्राथमिक उपचार घेतल्यानंतर तातडीने नगरच्या खासगी रुग्णालयात हलविण्यात आले होते. मात्र दुर्दैवाने त्याचा मृत्यू झाला. 

Web Title: young man died when he fell from a building while flying a kite

See Latest Marathi NewsAhmednagar News, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here