Home महाराष्ट्र Lockdown: १५ मे नंतर कडक लॉकडाऊनची शक्यता: राजेश टोपे

Lockdown: १५ मे नंतर कडक लॉकडाऊनची शक्यता: राजेश टोपे

Possibility of severe lockdown after May 15

Lockdown: महाराष्ट्रात अनेक जिल्ह्यांमध्ये परिस्थिती गंभीर आहे. तेथील रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ होत आहे, त्यामुळे काही जिल्ह्यात कडक लॉकडाऊन लावण्यात आला आहे. त्यामुळे राज्यातही कडक लॉकडाऊन होण्याची शक्यता आहे. असे मत आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी व्यक्त केले आहे.

कोरोनाची साखळी तोडण्यासाठी राज्यात १५ मे पर्यंत कडक निर्बंध लागू करण्यात आले आहे. आता १५ मे नंतर काय? असा प्रश्न विचारला जात असल्याच्या पार्शभूमीवर मंत्री टोपे बोलत होते.

दरम्यान कोरोना प्रतिबंधक लसीकरणासाठी राज्याला स्वतंत्र अॅप विकसित करण्याची परवानगी द्यावी अशी मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे केली आहे. त्याचबरोबर प्रतिबंधक लसींचा अनियमित पुरवठा लक्षात घेऊन राज्यसरकारला थेट कंपन्याकडून लस खरेदी करण्याची परवानगी द्यावी अशीही विनंती केली आहे. उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिले आहे.

Web Title: Possibility of severe lockdown after May 15

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here