Home अहमदनगर Satyjeet Tambe : सत्यजीत तांबे यांच्या निलंबनाची शक्यता, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसला शिफारस

Satyjeet Tambe : सत्यजीत तांबे यांच्या निलंबनाची शक्यता, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसला शिफारस

Nashik Graduate Constituency Election: सत्यजीत तांबे (Satyajeet Tambe) यांचे निलंबन करण्याच्या सूचना देण्यात आल्याची माहिती शिफारस महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसला शिस्तपालन समितीने दिली.

Possibility of suspension of Satyajeet Tambe recommendation to Maharashtra Pradesh Congress

Satyajeet Tambe : नाशिक पदवीधर निवडणुकीत नवीन वेगवेगळ्या घडामोडी घडत आहे.  पक्षाचा आदेश मोडल्यामुळे सुरुवातीला सुधीर तांबे यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली. तर आता अपक्ष उमेदवार सत्यजीत तांबे यांच्यावर देखील कारवाईचा बडगा उगारण्यात येणार असल्याची सूत्रांची माहिती आहे. तर यावर योग्य वेळी भूमिका स्पष्ट करणार अशी माहिती सत्यजीत तांबे यांनी दिली आहे.

नाशिक पदवीधर निवडणुकीत सलग तीन वेळा आमदार राहिलेले डॉ. सुधीर तांबे  यांना काँग्रेस पक्षाने उमेदवारी जाहीर केली मात्र ऐनवेळी काँग्रेस पक्षाचा आदेश झुगारुन तांबे यांनी पुत्र सत्यजीत तांबे यांचा उमेदवारी अर्ज भरला आणि तिथूनच राजकीय वातावरण तापण्यास सुरवात झाली. यानंतर राजकीयदृष्ट्या महत्वाच्या समजल्या जाणाऱ्या नाशिकमध्ये काँग्रेसची नाचक्की झाली. अखेर प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सत्यजीत तांबे यांना पाठिंबा देणार नसल्याचं सांगितलं. त्याचबरोबर हायकमांडकडे कारवाईची मागणी केली. दोनच दिवसात सुधीर तांबे यांचे निलंबन करण्यात आले. आता सत्यजीत तांबे यांच्यावर कारवाईची टांगती तलवार आहे.

दरम्यान सत्यजीत तांबे यांना निलंबित करण्यासाठी शिस्तपालन समितीने महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसला शिफारस केली आहे. त्यानुसार महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस सत्यजीत तांबे यांच्यावर कारवाई करणार असल्याचे समजते आहे. नाशिक पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत सुधीर तांबे यानी माघार घेत सत्यजीत तांबे यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केल्याने काँग्रेस पक्षात नाराजी पसरली आहे. या नाराजीचे सूर थेट दिल्लीपर्यंत पोहोचल्याने डाॅ. सुधीर तांबे यांच्यानंतर त्यांचे पुत्र सत्यजीत तांबे यांच्यावर निलंबनाची कारवाई होणार असल्याची माहिती आहे. सत्यजीत तांबे यांचे निलंबन करण्याच्या सूचना देण्यात आल्याची माहिती शिफारस महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसला शिस्तपालन समितीने दिली आहे.

Web Title: Possibility of suspension of Satyajeet Tambe recommendation to Maharashtra Pradesh Congress

See Latest Marathi NewsAhmednagar News, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here