Home महाराष्ट्र तांबे पिता-पुत्राच्या बंडानंतर काँग्रेसचा उमेदवार कोण? नाना पटोले म्हणाले…

तांबे पिता-पुत्राच्या बंडानंतर काँग्रेसचा उमेदवार कोण? नाना पटोले म्हणाले…

Nashik Graduate Constituency Election:  अद्याप कोणालाही पाठिंबा जाहीर केलेला नाही.

Who is the Congress candidate after the Tambe father-son rebellion

नाशिक पदवीधर मतदारसंघात काँग्रेसने घोषणा केलेले उमेदवार डॉ. सुधीर तांबे आणि त्यांचा मुलगा सत्यजीत तांबे यांनी बंडखोरी केल्यानंतर अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत. अशातच शुभांगी पाटील यांना शिवसेनेच्या ठाकरे गटाने पाठिंबा दिल्याची चर्चा आहे. या पार्श्वभूमीवर आता नाशिक पदवीधर मतदारसंघात काँग्रेस-महाविकासआघाडीचा उमेदवार कोण? असा प्रश्न काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंना विचारण्यात आला. त्यावर त्यांनी त्यांची भूमिका स्पष्ट केली.

नाना पटोले म्हणाले, “अद्याप कोणालाही पाठिंबा जाहीर केलेला नाही. या माध्यमांनी चालवलेल्या बातम्या आहेत. आमचा अंतिम निर्णय होईल आणि सोमवारी (१६ जानेवारी) नाशिक पदवीधर मतदारसंघासाठी महाविकासआघाडीचा उमेदवार जाहीर करू. नागपूरवरही चर्चा होणार आहे. दोन्ही उमेदवार महाविकासआघाडी म्हणून लढतील.”

महाराष्ट्रातील पाचही जागी महाविकासआघाडी जिंकेल अशी स्थिती आहे. बेईमानी करून दुसऱ्यांची घरं फोडणाऱ्या भाजपाचा खरा चेहरा पदवीधरांच्या, शिक्षकांच्या लक्षात आला आहे. त्यामुळे या दोन्ही निवडणुकांमध्ये लोक भाजपाला त्यांची जागा दाखवतील,” असं नाना पटोले यांनी म्हटलं.

Web Title: Who is the Congress candidate after the Tambe father-son rebellion

See Latest Marathi NewsAhmednagar News, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here