संगमनेर: धार्मिक भावना दुखावणारी पोस्ट, एकावर गुन्हा दाखल
Sangamner Crime: इन्स्टाग्राम खात्यावर एका धर्माच्या धर्मगुरुंबाबत मजकूर टाकून धार्मिक भावना दुखावल्याचा प्रकार, युवकाविरुद्ध गुन्हा दाखल.
संगमनेर: इन्स्टाग्राम खात्यावर एका धर्माच्या धर्मगुरुंबाबत मजकूर टाकून धार्मिक भावना दुखावल्याचा प्रकार काल दुपारी संगमनेरात घडला. याप्रकरणी एका युवकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत शहर पोलिसांकडून समजलेली माहिती अशी की, शहरातील नवीन नगर रोडवर राहणाऱ्या एका युवकाने आपल्या इन्स्टाग्राम खात्यावर एका धर्माच्या धर्मगुरूंच्या फोटोचा वापर करून फोटोच्या खाली योगीजी जेव्हा पंतप्रधान होतील, – योगीजी तेव्हा हे धर्मगुरू बोलतील मी हिंदू आहे आणि माझे पूर्वजही हिंदू होते. तसेच दुसऱ्या एका पोस्टमध्ये एका धर्माची महिला दुचाकीवर प्रवास करत असताना ती जय श्रीराम असा नारा देत आहे. ही पोस्ट काही जणांनी वाचली. दोन्ही पोस्ट आमच्या धार्मिक भावना दुखविण्याच्या उद्देशाने टाकल्या आहेत अशी तक्रार करण्यात आली. याबाबत एकाने शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. या फिर्यादीवरून सदर तरूणांवर पोलिसांनी याच्याविरुद्ध भादंवि कलम २९५ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सातपुते हे करीत आहे.
Web Title: post that hurts religious sentiments, a Crime has been registered
See Latest Marathi News, Ahmednagar News, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App