Home क्राईम संगमनेरातील ते दोघे सराईत गुन्हेगार अटकेत, पोलिसांची कारवाई  

संगमनेरातील ते दोघे सराईत गुन्हेगार अटकेत, पोलिसांची कारवाई  

Ahmednagar News: जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आलेल्या दोन सराईत गुन्हेगारांना एलसीबीच्या पोलिसांनी  संगमनेर व घारगाव येथुन ताब्यात घेत अटक (Arrested).

Those two criminals arrested in Sangamner

संगमनेर: नगर जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आलेल्या दोन सराईत गुन्हेगारांना एलसीबीच्या पोलिसांनी  संगमनेर व घारगाव येथुन ताब्यात घेत अटक (Arrested) केली. रावसाहेब किसन थोरात (वय 37 रा. कवठे कमळेश्वर ता. संगमनेर) व आण्णासाहेब सुर्यभान वाडगे (वय 41 रा. येठेवाडी, खंदरमळा ता. संगमनेर) अशी त्यांची नावे आहेत.

जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी एलसीबीचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांना आगामी सण व उत्सव अनुषंगाने नगर जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आलेल्या रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगारांना चेक करून सदरचे हद्दपार गुन्हेगार हद्दपार आदेशाचा भंग करून नगर जिल्ह्यामध्ये बेकायदेशिररित्या वास्तव्य करताना मिळून आल्यास कारवाई करणेबाबत आदेश दिले आहेत.

त्यानुसार निरीक्षक आहेर यांच्या नेतृत्वाखाली पोलीस अंमलदार दत्तात्रय हिंगडे, शंकर चौधरी, संतोष लोढे, संदीप चव्हाण, रणजीत जाधव व चंद्रकांत कुसळकर यांचे पथक संगमनेर  व घारगाव मधील हद्दपार गुन्हेगारांना चेक करीत असताना निरीक्षक आहेर यांना माहिती मिळाली कि,  हद्दपार इसम रावसाहेब थोरात व आण्णासाहेब वाडगे हे हद्दपार असताना लपूनछपून संगमनेर व घारगाव येथे त्यांचे राहते घरी वास्तव्य करीत आहेत.

आता गेल्यास मिळुन येईल, अशी खात्रीशीर माहिती मिळाल्याने पथकातील अंमलदार यांनी नमुद हद्दपार इसमांचा शोध घेतला असता हद्दपार इसम रावसाहेब किसन थोरात व आण्णासाहेब सुर्यभान वाडगे हे संगमनेर व घारगाव येथे त्यांचे राहते घरी मिळून आल्याने त्यांना ताब्यात घेत अटक केली आहे. त्यांचे विरूध्द संगमनेर तालुका व घारगाव पोलीस ठाण्यात महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 142 प्रमाणे गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत.

Web Title: Those two criminals arrested in Sangamner

See Latest Marathi NewsAhmednagar News, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here