Home संगमनेर संगमनेरात जुगार अड्डयावर छापा: १३ जणांवर गुन्हा दाखल- ३७ हजारांची रोकड जप्त

संगमनेरात जुगार अड्डयावर छापा: १३ जणांवर गुन्हा दाखल- ३७ हजारांची रोकड जप्त

संगमनेरात जुगार अड्डयावर छापा १३ जणांवर गुन्हा दाखल- ३७ हजारांची रोकड जप्त

संगमनेर: संगमनेर शहरातील तीनबत्ती चौकाजवळील जहागीरदार वाडा व तेलीखुंट येथे सुरु असलेल्या जुगार अड्डयावर उप विभागीय पोलीस अधिकारी कार्यालयाच्या पथकाने छापे टाकले. यामध्ये ३७ हजार रुपयांची रोकड व १० मोबाईल जप्त करण्यात आले असून १३ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

You May Also LikeShraddha Kapoor Upcoming Movies 

शहरातील जहागीरदार वाडा व तेलीखुंट येथे जुगार अड्डा सुरु असल्याची माहिती उप विभागीय पोलीस अधिकारी अशोक थोरात यांना गुप्त खबर्याकडून मिळाली त्यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथकाने जहागीरदार वाडा येथे चाप टाकला सदर ठिकाणी अब्दुल करीम शेख , रियाज बाबूमिया देशमुख, काझी रियाउद्दीन इस्माईल शेख , अश्रफ समशेरअली जहागीरदार हे जुगार खेळताना मिळून आले. त्यांच्याकडे ९ हजार ५०० रु. रोख रक्कम मोबाईल व जुगार खेळण्याचे साहित्य पोलिसांनी जप्त केले आहे.

तसेच तेलीखुंट येथे सुरु असलेल्या जुगार अड्डयावर देखील पोलिसांनी चाप टाकला. त्याठिकाणी दत्तात्रय शिंदे,अर्जुन कदम, मनोज ससाणे,नाना उकिर्डे, वसंत घाडगे,शंकर इटप हे जुगार खेळताना मिळू आले. या छाप्यात २८ हजार रुपयांची रोकड व १० मोबाईल तसेच जुगार खेळण्याचे साहित्य पोलिसांनी जप्त केले आहे. याबाबत आरोपींविरुद्ध मुंबई जुगार कायदा १२ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस निरीक्षक अभय परमार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस करत आहे.

websites

आमच्या मराठी बातम्या लाइव व्हाॅॅटस अॅप ग्रुपला जॉईन होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा. रहा अपडेट दररोज. धन्यवाद.  मराठी बातम्या लाइव–येथे क्लिक करा.


ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा. आपल्याला ही बातमी आवडल्यास फेसबुक वर जरूर शेअर करा धन्यवाद.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here