Home अकोले आयुष्याचा खरा आनंद भावनेच्या ओलाव्यात असतो-सुभाष बेणके

आयुष्याचा खरा आनंद भावनेच्या ओलाव्यात असतो-सुभाष बेणके

आयुष्याचा खरा आनंद भावनेच्या ओलाव्यात असतो-सुभाष बेणके.

जिल्हा परिषद प्राथमिक शाळेस साऊंड सिस्टीम भेट.
पिंपळगाव नाकविंदा/ प्रतिनिधी: जीवन जगत असताना कुठलच नातं ठरवून जोडता येत नाही ते आपोआप जोडले जाते. खरी अपुलकी, माया ही फार दुर्मिळ असते. हे दान ज्याला लाभत त्यालाच त्यातला खरा आनंद मिळवता येतो. त्याही पलीकडे आयुष्याचा खरा आनंद भावनेच्या ओलाव्यातच असतो.
खिरविरे(ता.अकोले) येथील कै. विठ्ठल त्र्यंबक बेणके यांच्या स्मरणार्थ अकोले आमृतसागर दुध संघाचे संचालक सुभाष बेणके यांचेकडून येथील जिल्हा परिषद प्राथमिक केंद्र शाळेस अध्यावत साऊंड सिस्टीम या यंत्राची भेट देण्यात आली. याप्रसंगी संचालक सुभाष बेणके यांनी प्रतिपादन केले.
यावेळी खिरविरे केंद्राचे केंद्रप्रमुख राजेंद्र बागडे, आदिवासी विविध कार्यकारी सोसायटीचे व्हा. चेअरमण प्रकाश पराड, शिक्षक संजय भांगरे, वामन डगळे, राजु काळे, संदिप कोटकर, मातोश्री गंगुबाई बेणकेआदी उपस्थित होते.
पुढे बोलताना संचालक सुभाष बेणके म्हणाले कि, आयुष्य खुप सुंदर आहे. एकमेकांना मदत करा. एकदा गेलेली वेळ पुन्हा येत नाही म्हणून आयुष्यातील प्रत्येक क्षणाचा आनंद घ्या. काहीतरी ध्येय लागते आपल्याला आयुष्यात जगायला. शेवटी अपयशाचीच गरज असते आयुष्यात खंबीर बनायला. घर छोटे असले तरी चालेल पण मन मोठे असले पाहीजे.असेही श्री. बेणके यांनी प्रतिपादन केले.
खिरविरे केंद्राचे केंद्रप्रमुख राजेंद्र बागडे यांनी ग्रामीण विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड गुणवत्ता असते. मात्र प्रत्येकाने स्वतःमधील न्यूनगंड काढून टाकावा. आपल्या व्यक्तीमत्वाची जडणघडण होत असताना आपल्यातील आवश्यक असणाऱ्या पैलूंची रुजवण होण्यासाठी मराठी शाळेतील शिक्षण महत्वाचे असून आपण कोठे व कोणत्या कुटुंबात जन्मलो याची लाज बाळगु नका. असे प्रतिपादन केले.
व्हा. चेअरमन प्रकाश पराड यांनी काही माणसं स्वतः घडलो म्हणून समाधान मानत नाहीत. तर आपल्या बरोबर आपण ज्या वर्गातून आलो, तो वर्गही घडला पाहीजे या वृत्तीतुन पेटून उठतात. हिच उर्मी सुभाष बेणके यांच्या ठायी आहे. म्हणूनच खऱ्या अर्थाने समाजप्रती असलेली बांधिलकी कृतीतुन जपण्याचे कार्य कौतुकास्पद असल्याचे प्रतिपादन केले.
ज्या समाजात आपण राहतो त्याचे काहीतरी देणे लागतो. या देण्यातुन उतराई होण्यासाठी दायित्व देण्यासाठी माणूसपण हवे ते माणूसपण जपण्याचे कार्य या स्तुत्य उपक्रमातुन घडले. या स्तुत्य उपक्रमाचे खिरविरे परिसरात कौतुक होत आहे.
websites

आमच्या मराठी बातम्या लाइव व्हाॅॅटस अॅप ग्रुपला जॉईन होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा. रहा अपडेट दररोज. धन्यवाद.  मराठी बातम्या लाइव–येथे क्लिक करा.


ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा. आपल्याला ही बातमी आवडल्यास फेसबुक वर जरूर शेअर करा धन्यवाद.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here