भाऊसाहेब वाकचौरेच्या बंडखोरीचा अकोल्यात निषेध
भाऊसाहेब वाकचौरेच्या बंडखोरीचा अकोल्यात निषेध
अकोले: शिर्डी लोकसभा मतदार संघात माजी खा. भाऊसाहेब वाकचौरे यांनी केलेल्या बंडखोरीचा अकोले तालुका शिवसेना व भाजपा पक्षाच्या वतीने निषेध करण्यात आला आहे. भाजपा तालुकाध्यक्ष सीताराम भांगरे यांनी भाऊसाहेब वाकचौरे यांचा बंडखोरीचा जाहीर निषेध केला आहे.
शिवसेना भाजपा युती झाल्यामुळे शिर्डी लोकसभेची जागा शिवसेनच्या विद्यमान खासदार सदाशिव लोखंडे यांना देण्यात आलेली आहे. मात्र भाजपाच्या कोट्यातून शिर्डी संस्थानाचे विश्वस्त असलेल्या भाऊसाहेब वाकचौरे यांनी शिर्डीतून अपक्ष निवडणूक लढवून बंडखोरी केली आहे. त्यामुळे वाकचौरे यांची भूमिका हि युती धर्माच्या विरोधात आहे. त्यामुळे भाऊसाहेब वाकचौरे यांना अकोले तालुक्यातील भाजपाचा एकही कार्यकर्ता मत देणार नाही असा विश्वास भाजपा तालुकाध्यक्ष सीताराम भांगरे यांनी व्यक्त केला आहे. भाऊसाहेब वाकचौरे यांना पक्षाने काहीच कमी पडू दिले नाही तरीही वाकचौरे युती धर्माच्या विरोधात जाऊन वागत आहे. त्यांच्या या बंडखोरीचा अकोले तालुका भाजप व शिवसेनच्या वतीने जाहीर निषेध करण्यात आलेला आहे.
Website Title: Prohibition of rebellion of Bhausaheb Wakchaure