Home अहमदनगर अहमदनगर जिल्ह्यात १६ दिवस प्रतिबंधात्मक आदेश जारी

अहमदनगर जिल्ह्यात १६ दिवस प्रतिबंधात्मक आदेश जारी

Ahmednagar News:  गर्दी करणे टाळावे. जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले.

Prohibitory order issued in Ahmednagar

अहमदनगर: नारळी पौर्णिमा ( रक्षाबंधन), श्रावण पोर्णिमा, अहिल्याबाई होळकर पुण्यतिथी, स्वातंत्र्यदिन, पारशी नूतनवर्ष, श्रीकृष्ण जयंती, गोपाळकाला, संत सेना महाराज पुण्यतिथी, पोळा हे सण व उत्सव जिल्ह्यात साजरे होणार आहेत. या पार्श्वभूमीवर सार्वजनिक शांतता, कायदा व सुव्यवस्था अबाधित राखणे यासाठी महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ चे कलम ३७ (१) अन्वये जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांच्या आदेशानुसार ११ ते २६ ऑगस्ट २०२२ या कालावधीत अहमदनगर शहर व जिल्ह्यात प्रतिबंधात्मक आदेश जारी करण्यात आले आहेत.

कामगार संघटनातर्फे त्यांच्या प्रलंबित मागण्यासाठी मोर्चे, धरणे आंदोलने, रास्ता रोको, प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन अशा प्रकारचे आंदोलने होतात. या काळात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी पोलीसांना मदत व्हावी म्हणून संपूर्ण अहमदनगर शहर व जिल्ह्यात ११ ऑगस्ट ते २६ ऑगस्ट २०२२ या कालावधीत महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ चे कलम ३७ (१) चे प्रतिबंधात्मक आदेश जारी जारी करण्यात आले आहेत.

प्रतिबंधात्मक आदेश असताना शस्त्रे, काठया, सोटे तलवारी भाले, सुरे,. बंदुका, दंडे अगर लाठ्या किंवा शारिरीक इजा करणेसाठी वापरता येईल अशी कोणतीही वस्तू बरोबर नेणे, दगड किंवा इतर क्षेपणास्त्रे किंवा जिल्ह्यात या सण व उत्सवादरम्यान गर्दी होते. विविध राजकीय पक्ष क्षेपणास्त्रे सोडावयाची किंवा आवश्यक आहे.

फेकावयाची उपकरणे व साधने जवळ बाळगणे किंवा तयार करणे किंवा जमा करणे, कोणत्याही व्यक्तींच्या आकृत्या किंवा त्यांच्या प्रतिमेचे प्रदर्शन करणे, कोणताही दाहक पदार्थ किंवा स्फोटक जवळ बाळगणे किंवा तयार करणे, सभ्यता अगर नितीमत्ता यास धक्का पोहचेल किंवा शांतता धोक्यात येईल असे कोणतेही कृत्य करणे, आवेषपूर्ण भाषणे करणे, हावभाव करणे किंवा सॉंग आणणे अगर तशी चित्रे, चिन्हे किंवा इतर वस्तू तयार करणे किंवा त्यांचा प्रचार करणे यास प्रतिबंध करण्यात आला आहे. शासकीय सेवेतील व्यक्तींना कर्तव्य पुर्तीसाठी हत्यार जवळ बाळगणे आवश्यक आहे.

Web Title: Prohibitory order issued in Ahmednagar

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here