Home अहमदनगर अहमदनगर ब्रेकिंग: हॉटेलांमध्ये सेक्स रॅकेट चालवणाऱ्या वेश्या व्यवसायाचा पर्दाफाश, सात महिलांची सुटका

अहमदनगर ब्रेकिंग: हॉटेलांमध्ये सेक्स रॅकेट चालवणाऱ्या वेश्या व्यवसायाचा पर्दाफाश, सात महिलांची सुटका

Ahmednagar News:  हॉटेलांमध्ये सेक्स रॅकेट (Sex racket) चालवून बळजबरीने वेश्या व्यवसाय (Prostitutes) करणाऱ्यांचा पर्दाफाश, हॉटेल कुलस्वामिनी, हॉटेल विलास व हॉटेल प्रवरा या तीन ठिकाणी पोलिसांनी छापा टाकून देहविक्री करणार्‍या 7 महिलांची सुटका.

Prostitutes running sex rackets in hotels exposed

नेवासा | Newasa: नेवासा शहरात शहरातील हॉटेल कुलस्वामिनी, हॉटेल विलास व हॉटेल प्रवरा या तीन ठिकाणी पोलिसांनी छापा टाकून देहविक्री करणार्‍या 7 महिलांची सुटका केली.

नेवासा येथील हॉटेलांमध्ये सेक्स रॅकेट चालवून बळजबरीने वेश्या व्यवसाय करून घेतला जात असल्याची गुप्त माहिती मिळाल्यावरून पोलिसांनी याठिकाणी बनावट ग्राहक पाठवून पंचासमक्ष छापा टाकला. यावेळी सात पीडित महिलांची सुटका करण्यात आली आहे.

त्यानुसार आरोपी मच्छिंद्र ज्ञानदेव कुटे, गणेश रामचंद्र चव्हाण, रामदास नामदेव काळे सर्व रा.नेवासा यांच्याविरुद्ध नेवासा पोलीस ठाण्यात महिला आणि मुलींचे अनैतिक व्यापारास प्रतिबंध अधिनियम कलम 3,4,5,7,8 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एकाच वेळी तीन ठिकाणी नियोजनबद्ध पद्धतीने छापे टाकण्यात आले. या कारवाईमुळे नेवासा परिसरातील व शहरातील अवैध धंदे करणार्‍यांचे धाबे दणाणले आहेत.

सदरची कारवाई सहायक पोलीस निरीक्षक शिवाजीराव डोईफोडे, पोलीस निरीक्षक चौधरी, पोलीस निरीक्षक पुजारी, सहायक पोलीस निरीक्षक राजेंद्र आरोळे, पोलीस नाईक प्रशांत ननावरे, बबन तमनर, बाळासाहेब नागरगोजे, महिला पोलीस नाईक सविता उंद्रे, कॉन्स्टेबल आसाराम बटुळे, शाम गुंजाळ, महिला पोलीस कॉन्स्टेबल शिरसाठ व सुषमा जाधव यांनी केली.

Web Title: Prostitutes running sex rackets in hotels exposed

See Latest Marathi NewsAhmednagar News, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here