Home अहमदनगर अहमदनगर ब्रेकिंग: मुळा धरणात अज्ञात इसमाचा मृतदेह आढळल्याने खळबळ

अहमदनगर ब्रेकिंग: मुळा धरणात अज्ञात इसमाचा मृतदेह आढळल्याने खळबळ

Ahmednagar News: मुळा धरणात आज दुपारच्या दरम्यान एका अज्ञात इसमाचा मृतदेह (Dead Body) पाण्यावर तरंगताना आढळून.

Dead body of unknown Isma was found in Mula Dam

राहुरी | Rahuri: राहुरी तालुक्यातील मुळानगर येथे असलेल्या मुळा धरणात आज दुपारच्या दरम्यान एका अज्ञात इसमाचा मृतदेह पाण्यावर तरंगताना आढळून आला. सदर घटना ही संशयास्पद वाटत असून घातपाताची चर्चा स्थानिकांमधून सुरू होती. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, बुधवार दिनांक 5 एप्रिल रोजी राहुरी तालुक्यातील मुळा धरणात दुपारी दोन वाजे दरम्यान धरणाच्या पाण्यावर एका अज्ञात इसमाचा मृतदेह तरंगताना दिसून आला. यावेळी धरण परिसरात तरुणांनी  पाण्यावर तरंगत असलेला मृतदेह  पाण्याच्या बाहेर काढण्यासाठी मदत केली.

त्यानंतर माजी सरपंच अंकुश बर्डे यांनी राहुरी पोलिस ठाण्यात खबर दिली. मात्र, कोणताही व्यक्ती पाण्यात बूडाल्या नंतर दोन ते तीन दिवसा नंतर मृतदेह फुगून पाण्यावर तरंगत असतो. परंतू, सदर व्यक्ती ही काही तासांतच पाण्यावर तरंगताना दिसून आला असल्याने परिसररात खळबळ उडाली आहे. घटनेची माहीती मिळताच पोलिस प्रशासनाने घटनास्थळी धाव घेऊन मृतदेह धरणाच्या पाण्यातून बाहेर काढून मयत इसमाची ओळख पटवण्यासाठी तपास सुरू आहे.

Web Title: Dead body of unknown Isma was found in Mula Dam

See Latest Marathi NewsAhmednagar News, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here