परमिट रूममध्ये सुरु असलेला वेश्याव्यवसाय व सेक्स राकेटचा पर्दाफाश
Sex Racket: एमआयडीसीतील राजलक्ष्मी हॉटेल, परमिट रूम, बार व लॉजिंग मध्ये वेश्याव्यवसाय (Prostitution Business) .
बारामती: परमिट रुममध्ये सुरु असलेल्या वेश्या व्यवसायाचा (Prostitution Business) बारामती ग्रामीण पोलिसांनी छापा टाकून पर्दाफाश केला आहे. ही कारवाई बारामती एमआयडीसीतील राजलक्ष्मी हॉटेल, परमिट रूम, बार व लॉजिंग येथे करण्यात आली. या कारवाईत दोन महिलांची सुटका करुन तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर एकाला अटक केली आहे.
किरण बापू पाटील (मूळ रा. हाजी मंलग रोड, कल्याण पूर्व, सध्या रा. पसवली, ता. भिवंडी), युवराज लोखंडे व विठ्ठल चव्हाण (रा. राजलक्ष्मी लॉज) या तिघांवर अनैतिक व्यापार प्रतिबंध अधिनियमानुसार गुन्हा दाखल करून किरण पाटील याला अटक केली आहे. याबाबत पोलीस हवालदार गणेश शिवदास काटकर यांनी बारामती तालुका पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश इंगळे यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे. आरटीओ कार्यालयजवळ असणाऱ्या राजलक्ष्मी हॉटेल, परमिट रुम, बार व लॉजिंग मध्ये वेश्याव्यवसाय सुरु असल्याची माहिती इंगळे यांना मिळाली होती.
त्यानुसार पंच व बनावट ग्राहकांना सोबत घेत पथक हॉटेलमध्ये पोहचले. बनावट ग्राहकाकडे काही नोटा देऊन त्याचे क्रमांक नमूद करून घेण्यात आले. ग्राहकाने वेश्यागमनासाठी महिलेची मागणी केली. त्यावेळी ग्राहकाला 1200 रुपये दर असल्याचे सांगण्यात आले. त्यानुसार त्याने पैसे देऊन पथकाला इशारा केला. पथकाने छापा टाकून व्यवस्थापक किरण पाटील याला ताब्यात घेतले. एका खोलीतून दोन महिलांची सुटका केली. यातील एक महिला ओडिशा तर दुसरी आसाम राज्यातील आहे. पोलिसांनी रोख रकमेसह मोबाईल जप्त केला आहे.
Web Title: Prostitution and sex racket going on in permit rooms exposed