Home पुणे दोन मैत्रिणींच्या आत्महत्यांने खळबळ, तपासात धक्कादायक कनेक्शन

दोन मैत्रिणींच्या आत्महत्यांने खळबळ, तपासात धक्कादायक कनेक्शन

Pune Suicide Case: दोघींनी आत्महत्या का केली याचं कारण अद्याप समोर आले नाही.

Pune the suicide of two friends

पुणे: पुणे येथील हडपसरजवळील शेवाळेवाडी येथून धक्कादायक बातमी समोर आली आहे. शेवाळेवाडी गावातील जिल्हा परिषदेच्या शाळेजवळ असलेल्या अभिनंदन क्रिस्टल टॉवर या इमारतीमध्ये मंगळवारी सायंकाळी सात वाजेच्या सुमारास दोन मैत्रिणींनी आत्महत्या (Suicide) केल्याची धक्कादायक घटना घडली.

आकांक्षा औदुंबर गायकवाड (वय १९) आणि सानिका हरिश्चंद्र भागवत (१९) असं आत्महत्या केलेल्या मैत्रिणीची नावे आहेत. दोघींनी आत्महत्या का केली याचं कारण अद्याप समोर आले नाही.

याबाबत मिळालेली माहिती अशी की,  सानिकाने सायंकाळी पाच वाजल्याच्या सुमारास अभिनंदन क्रिस्टल टॉवर या इमारतीमधील आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या (Suicide) केली. हे आकांक्षाला समजताच ती त्या ठिकाणी पोहोचली, त्यानंतर सानिकाचा मृतदेह शवविच्छेदनासाठी घेऊन जात असताना आकांक्षांनी पाहिला. हा धक्का आकांक्षाला सहन न झाल्याने तिने पाचव्या मजल्या वरून उडी मारून आपले जीवन संपविल्याची घटना घडली. या दोन आत्महत्यांचा आपसांमध्ये काही संबंध आहे का याचा तपास हडपसर पोलीस करत आहेत.

दोन तरुण मैत्रिणींचा असा शेवट झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. आकांक्षाने राहत्या घरातच गळफास लावून घेतल्याने तिच्या कुटुंबीयांना मोठा धक्का बसला आहे. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहे.

Web Title: Pune the suicide of two friends

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here