Home क्राईम स्वतः च्या राहत्या घरात वेश्याव्यवसाय, महाविद्यालयीन विद्यार्थींना पैशांचे आमिष दाखवून देहव्यापार

स्वतः च्या राहत्या घरात वेश्याव्यवसाय, महाविद्यालयीन विद्यार्थींना पैशांचे आमिष दाखवून देहव्यापार

महिला तिच्या साथीदार तरुणीच्या सहाय्याने स्वतःच्या राहत्या घरातून वेश्याव्यवसाय (Prostitution) रॅकेट, महाविद्यालयीन विद्यार्थींना पैशांचे आमिष दाखवून देहव्यापारात ढकलल्याचे प्राथमिक तपासात आले समोर.

Prostitution in own residence, college girl rescue

भाईंदर : मीरा भाईंदर परिसरात वेश्याव्यवसाय रॅकेट चालवणाऱ्या महिलेला मीरा-भाईंदर-वसई विरार पोलिसांच्या मानव तस्करी विरोधी युनिटने अटक केली आहे. ही महिला तिच्या साथीदार तरुणीच्या सहाय्याने स्वतःच्या राहत्या घरातून वेश्याव्यवसाय रॅकेट चालवत होती. याबाबत गुप्त माहिती मिळाली होती. त्या माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचला आणि रॅकेटची सूत्रधार असलेल्या महिलेला अटक केली आहे. अटक महिलेविरुद्ध भादंवि कलम 370 आणि अनैतिक तस्करी प्रतिबंध कायद्याच्या संबंधित कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी महिलेची साथीदार आयशा शेख ही फरार झाली आहे.

पोलीस पथकाने वेश्याव्यवसाय रॅकेट उद्धवस्त करतानाच या रॅकेटच्या तावडीतून एका विद्यार्थिनींची सुटका केली आहे. या विद्यार्थिनीची रवानगी कांदिवली येथील पुनर्वसन गृहात करण्यात आली आहे.

रॅकेटची सूत्रधार असलेली आणि अटक करण्यात आलेली महिला ही अवघ्या तिशीच्या वयोगटातील आहे. सायरा शेख उर्फ दिव्या मंगळकर असे या महिलेचे नाव आहे. ती भाईंदर येथील स्वतःच्या घरातून वेश्याव्यवसायाचे रॅकेट (Sex Racket) चालवत होती. तिने महाविद्यालयीन विद्यार्थींना पैशांचे आमिष दाखवून देहव्यापारात ढकलल्याचे प्राथमिक तपासात उघडकीस आले आहे.

Web Title: Prostitution in own residence, college girl rescue

See also: Latest Marathi NewsAhmednagar NewsEducation Study and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here