तू दिसायला छान नाहीस, मी दुसरं लग्न करतोय, म्हणताच पत्नीने केली आत्महत्या
Beed Crime: धक्कादायक प्रकार समोर आला आहे, पतीने दुसरं लग्न करत असल्याचे सांगितल्याने पत्नीने विषारी द्रव प्राशन करून आत्महत्या (Suicide) केल्याची घटना.
Beed News : बीड जिल्ह्याच्या धार तालुक्यातील कासारी गावात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. पतीने दुसरं लग्न करत असल्याचे सांगितल्याने पत्नीने विषारी द्रव प्राशन करून आत्महत्या केली. तू मला आवडत नाही, तू घरातून निघून जा, आता मी दुसरे लग्न करणार असल्याची धमकी पतीने दिल्यानेच पत्नीने आत्महत्या केल्याचा आरोप करण्यात आला आहे. ही घटना 18 मे रोजी धार तालुक्यातील कासारी गावात घडली. तर याप्रकरणी विवाहितेच्या वडिलांच्या फिर्यादीवरून पती, जावई व नंदावा यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.
ऋतुजा कृष्णा फड (वय 26 वर्षे, रा. हिंगणगाव, ता. अहमदपुरी) असे आत्महत्या केलेल्या विवाहितेचे नाव आहे. विवाहितेच्या वडिलांच्या फिर्यादीनुसार, 24 डिसेंबर 2021 रोजी विवाहितेचा विवाह हिंगणगाव (ता. अहमदपूर) झाला होता. सुरुवातीचे काही दिवस तिला सुखाने नांदविले, परंतु, नंतर छळ सुरू केला. 7 मे रोजी कृष्णाने ऋतुजाला माहेरी कासारी येथे आणून सोडले. यावेळी विवाहितेने झालेल्या अन्यायाचा पाढा वडिलांसमोर वाचला. तुला मुले होत नाहीत, तू दिसायला छान नाहीस, तू आता घरातून निघून जा, आम्हाला दुसरे लग्न करायचे आहे, असे म्हणत तिला शिवीगाळ करून मारहाण करण्यात येत असल्याचं तिने आपल्या वडिलांना सांगितले. यामुळे ऋतुजा मानसिक तणावात होती. दरम्यान 18 मे रोजी तिचे आई-वडील शेतात काम करण्यासाठी गेले. परत आल्यावर त्यांना ऋतुजा घरातील व्हरांड्यात बेशुद्ध पडलेली दिसली. त्यांनी रुग्णालयात दाखल केले असता, डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. त्यामुळे याप्रकरणी विवाहितेचे वडील बाबुराव बडे यांच्या फिर्यादीवरून पती कृष्णा फड, सासू चिंगुबाई फड व नंदावा राहुल मुंडे यांच्याविरोधात धारूर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
Web Title: Wife commits suicide saying ‘You are not good looking
See also: Latest Marathi News, Ahmednagar News, Education Study and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App