राहत्या घरात कुंटणखाना, आंटी पोलिसांच्या ताब्यात
Prostitution in Latur: स्वत:च्या राहत्या घरात कुंटणखाना चालविणाऱ्या एका महिलेच्या घरावर पोलिस पथकाचा छापा (Raid), कुंटणखाना चालविणाऱ्या आंटीला अटक.
लातूर: शहरातील अंबाजोगाई रोड परिसरात स्वत:च्या राहत्या घरात कुंटणखाना चालविणाऱ्या एका महिलेच्या घरावर पोलिस पथकाने छापा मारला. यावेळी कुंटणखाना चालविणाऱ्या आंटीला अटक केली असून, पीडित दोन महिलांची सुटका करण्यात आली आहे. याबाबत शिवाजीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेने शहरात खळबळ उडाली आहे.
पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, लातुरातील अंबाजोगाई रोड भागात राहणारी एक महिला इतर महिलांकडून देहविक्रय व्यवसाय करून घेत असल्याची माहिती खबऱ्याने अनैतिक मानवी व्यापार प्रतिबंध विभागाला दिली. या माहितीच्या आधारे प्रशिक्षणार्थी पोलिस उपाधीक्षक अंकिता कणसे यांच्या मार्गदर्शनाखाली अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षाच्या महिला पोलिस उपनिरीक्षक श्यामल देशमुख, सुभाष सूर्यवंशी, अंमलदार जाधव, योगी, सुधामती वंगे, लता गिरी यांच्या पथकाने महिलेच्या घरी डमी ग्राहक पाठवून छापा मारला. यावेळी घरात दोन पीडित महिला आढळून आल्या. त्यांच्याकडून आंटी देहविक्रय व्यवसाय करून घेत होती. त्यांच्याकडून मोबाइल, रोख रक्कम आणि इतर साहित्य, असा मुद्देमाल जप्त करण्यात आला. यावेळी पोलिसांनी पीडित महिलांची सुटका करण्यात आली असून आंटीला अटक केली आहे. याबाबत शिवाजीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Web Title: Prostitution in a residential house, Aunty in custody of police
See also: Latest Marathi News, Sangamner News, Ahmednagar News, Education Study, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App