Home क्राईम नाशिक हादरलं! भररस्त्यात धारदार शस्त्राने तरुणाची हत्या, पाठलाग करून केले सपासप वार

नाशिक हादरलं! भररस्त्यात धारदार शस्त्राने तरुणाची हत्या, पाठलाग करून केले सपासप वार

Nashik Youth Murder On Road: दुचाकीवरुन जाणाऱ्या १९ वर्षीय तरुणाचा पाठलाग करत भररस्त्यात हत्या केल्याची घटना, अज्ञात हल्लेखोरांनी त्याचा पाठलाग केला आणि धारदार हत्याराने त्याच्यावर वार.

a young man was Murder with a sharp weapon in Bharara, chased and stabbed

नाशिक:  दुचाकीवरुन जाणाऱ्या १९ वर्षीय तरुणाचा पाठलाग करत भररस्त्यात हत्या केल्याची घटना नाशिकमध्ये घडली आहे. नाशिकच्या पुणे रोडवरील नासर्डी ब्रिज ते बोधलेनगर मार्गावर ही घटना घडली. तुषार देवराम चोरे नावाच्या तरुणाचा जागीच मृत्यू झाला. या घटनेने नाशिक हादरलं आहे. भररस्त्यात तरुणाची हत्या करण्यात आल्याने परिसरातील नागरिकांमध्ये खळबळ उडाली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, नाशिकच्या बोधलेनगर परिसरात तुषार चोरे आपल्या मित्रासोबत दुचाकीवरून जात होता. तेवढ्यात चार ते पाच अज्ञात हल्लेखोरांनी त्याचा पाठलाग केला आणि धारदार हत्याराने त्याच्यावर वार केले. या घटनेत तुषारचा अतिरक्तस्त्राव झाल्याने जागीच मृत्यू झाला.

मृत तुषार हा महाविद्यालयीन शिक्षण घेत होता. शनिवारी रात्रीच्या सुमारास दुचाकीवरुन जात असताना काही संशयित दुचाकीवरुन आले आणि त्यांनी नासर्डी ब्रिजपासून पाठलाग करुन त्याला गाठले. त्यानंतर उपनगर हद्दीतील बोधलेनगर परिसरात पोहोचताच त्याच्यावर धारदार सुरी आणि गुप्तीने सपासप वार केले. या हल्ल्यात तुषार जमीनीवर कोसळला. अतिरक्तस्त्रावर झाल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. हल्ल्यानंतर दुचाकीवरील संशयित पसार झाले.

या हत्येचा संपूर्ण घटनाक्रम पुणे रोडवर असलेल्या विविध खासगी दुकाने आणि आस्थापनांच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांत कैद झाला आहे. घटनेची माहिती मिळताच परिमंडळ एकचे उपायुक्त किरणकुमार चव्हाण, झोन दोनचे उपायुक्त चंद्रकांत खांडवी, गुन्हेशाखेचे सहायक आयुक्त डॉ. सीताराम कोल्हे, उपनगरचे वरिष्ठ निरीक्षक विजय पगारे, युनिट एकचे वरिष्ठ निरीक्षक विजय ढमाळ, मुंबई नाका पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक युवराज पत्की व युनिट दोनचे निरीक्षक रंजीत नलवडे आदींसह आधिकारी व अंमलदार दाखल झाले.

तुषारचा मृतदेह उत्तरीय चाचणीसाठी पाठविण्यात आला असून हल्लेखारांचा शोध घेण्यासाठी पोलिसांची पथकं रवाना झाली आहेत. तुषारची हत्या कोणी आणि कशासाठी केली आहे याबाबत पोलीस तपास करत आहे. या घटनेप्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात अज्ञात हल्लेखोरांविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Web Title: a young man was Murder with a sharp weapon in Bharara, chased and stabbed

See also: Latest Marathi NewsSangamner NewsAhmednagar NewsEducation Study, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here