Home क्राईम स्पा सेंटरच्या नावाखाली वेश्याव्यवसाय, स्पा सेंटर चालवणाऱ्या महिलेला अटक

स्पा सेंटरच्या नावाखाली वेश्याव्यवसाय, स्पा सेंटर चालवणाऱ्या महिलेला अटक

Pune Crime: स्पा सेंटरच्या नावाखाली वेश्याव्यवसाय (Prostituition) चालणाऱ्या ठिकाणी पोलिसांनी छापा टाकून दोन महिलांची सुटका.

Prostitution in the name of spa center, woman running spa center arrested

पिंपरी : स्पा सेंटरच्या नावाखाली वेश्याव्यवसाय चालणाऱ्या ठिकाणी पोलिसांनी छापा टाकून दोन महिलांची सुटका करण्यात आली आहे. ही कारवाई गुरुवारी (दि. १०) पिंपळे सौदागर येथे पोलिसांनी केली. या प्रकरणी अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक वाहतूक कक्ष पोलिस हवालदार सुनील जगन्नाथ शिरसाट (वय ४४) यांनी वाकड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार पोलिसांनी स्पा सेंटर चालवणाऱ्या महिलेला अटक करण्यात आली आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी ही स्पा सेंटरच्या नावाखाली दोन महिलांना पैशाचे आमिष दाखवून वेश्याव्यवसाय करून घेत होती. त्यातून मिळणाऱ्या पैशातून आपली उपजीविका चालवत होती. पोलिसांनी छापा टाकत दोन महिलांची सुटका केली असून सेंटर चालवणाऱ्या महिलेला अटक करण्यात आली आहे.

Web Title: Prostitution in the name of spa center, woman running spa center arrested

See also: Latest Marathi NewsSangamner NewsAhmednagar NewsEducation Study, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here