Home क्राईम मानवतेला काळीमा फासणारी घटना, धक्कादायक घटना

मानवतेला काळीमा फासणारी घटना, धक्कादायक घटना

Rape Case: एका आठ महिन्याच्या गर्भवती महिलेसोबतही घटना.

Rape Case A shocking event that blackened humanity

गडचिरोली:  कुरखेडा तालुक्यात मानवतेला काळीमा फासणारी धक्कादायक घटना समोर आली आहे.  धमधीटोला येथील दोन नराधमांनी धक्कादायक कृत्य  केले. तेही एका आठ महिन्याच्या गर्भवती महिलेसोबतही घटना घडली आहे.  त्यामुळे या दोन नराधमांना पोलिसांनी अटक केली आहे. कुरखेड्यावरून दोन किलोमीटर अंतररावर धमदीटोला गाव आहे. विवाहित महिला प्रसुतीसाठी माहेरी आली होती. ती आठ महिन्यांची गर्भवती होती. तरीही दोन सख्या भावांच्या वासनेची बळी ठरली.

विवाहित महिला प्रसुतीसाठी माहेरी आली होती. शेतीची कामे सुरू असल्याने घरातील सर्व जण कामानिमित्त शेतावर गेले होते. ती घरी एकटीच होती. दुपारी १२ वाजता दोन भाऊ विवाहित महिलेच्या घरात शिरले. दोघांनीही तिच्यावर अत्याचार केला. कुटुंबीय संध्याकाळी घरी आले. त्यानंतर तिने आपबिती कुटुंबीयांना सांगितली. गुरुवारी रात्री दोन्ही आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

ताराचंद कपूरडेरीया (वय ३० वर्षे) आणि संजय कपूरडेरीया (वय ३२ वर्षे)अशी या दोन आरोपी भावांची नावे आहेत. कुरखेडा पोलिसांनी रात्रीच दोघांनाही बेड्या ठोकल्या. पीडित महिलेने कुरखेडा पोलिसांत तक्रार दिली. ठाणेदार संदपी पाटील यांनी घटनेचे गांभीर्य ओळखून रात्रीच दोन्ही आरोपींना अटक केली.

दोन्ही नराधमांविरोधात विरोधात भादंवि ३७६, ३७६ (ड) अन्वये गुन्हा दाखल केला. पीडित महिला ८ महिन्यांची गर्भवती आहे. त्यामुळे वैद्यकीय परिक्षणाकरिता गडचिरोलीतील जिल्हा सामान्य रुग्णालयात पाठवण्यात आले.

ताराचंद आणि संजय कपूरडेरीया या दोघांना आज न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने दोघांनाही दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. अधिक तपास ठाणेदार संदीप पाटील यांचा मार्गदर्शनात साहायक पोलीस निरीक्षक दिनेश गावंडे करीत आहेत. या विकृत घटनेने परिसरात खळबळ उडाली  आहे.

Web Title: Rape Case A shocking event that blackened humanity

See also: Latest Marathi NewsSangamner NewsAhmednagar NewsEducation Study, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here